mandira bedi at husband raj kaushal last rites Twitter
मनोरंजन

काही तास आधीच राज यांनी मंदिराला सांगितली होती 'ही' गोष्ट

राज यांचे खास मित्र आणि संगीत दिग्दर्शक सुलेमान मर्चंट यांनी दिली माहिती

स्वाती वेमूल

अभिनेत्री मंदिरा बेदीचा Mandira Bedi पती राज कौशल Raj Kaushal यांचे कार्डिअॅक अरेस्टने बुधवारी पहाटे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. राज यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. राज यांची प्रकृती एक दिवस आधीच ढासळली असल्याचं त्यांचा मित्र आणि संगीत दिग्दर्शक सुलेमान मर्चंटने Sulaiman Merchant सांगितलं. राज यांनी हृदयविकाराचा झटका येत असल्याचं मंदिराला सांगितलं होतं, असं ही ते म्हणाले. पण त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत उशीर झाला होता. (Raj Kaushal told wife Mandira Bedi he was getting a heart attack says friend Sulaiman Merchant)

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सुलेमान म्हणाले, "मंगळवारी संध्याकाळपासूनच राज यांना बरं वाटत नव्हतं. त्यांनी काही अँटासिड टॅबलेट घेतल्या पण दुसऱ्या दिवशी पहाटेच चार वाजताच्या सुमारास त्यांनी मंदिराला सांगितले की, हृदयविकाराचा झटका येतोय. त्यानंतर मंदिराने मित्र आशिष चौधरीला बोलावून राज यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली. पण तितक्यात राज बेशुद्ध झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले."

राज यांना ३०-३२ वर्षांचे असतानाही हृदयविकाराचा झटका आल्याचं सुलेमानने सांगितलं. पहिल्या झटक्यानंतर राज यांना स्वत:ची काळजी घेण्यास सुरुवात केली होती, असंही ते म्हणाले. राज आणि सुलेमान हे गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. राज यांनी दिग्दर्शित केलेल्या 'प्यार मे कभी कभी' या पहिल्या चित्रपटाला सलीम आणि सुलेमान या जोडीने संगीत दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : सोनी-पाटगावमध्ये सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून; मिरज तालुका हादरला, सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण

आजचे राशिभविष्य - 09 ऑगस्ट 2026

Mount Kun Peak : पुण्यातील गिर्यारोहकांकडून ‘माउंट कुन’ सर; ७०७७ मीटर उंचीवर चढाई

Mother Son Journey Through America : आईसोबतची अनोखी अमेरिकावारी

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

SCROLL FOR NEXT