Raj Kundra sherlyn chopra  esakal
मनोरंजन

Raj Kundra Case: शिल्पा शेट्टीच्या पतीला अखेर जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या पतीच्या राज कुंद्राच्या त्या पराक्रमामुळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

सकाळ डिजिटल टीम

Raj kundra bollywood actress shilpa shetty husband: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या पतीच्या राज कुंद्राच्या त्या पराक्रमामुळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे काही महिने तिला तर एकांतवासात जावं लागलं होतं. ती ज्या रियॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती त्यातही तिनं सहभाग घेणं टाळलं होतं.

उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती अशी ओळख असलेल्या राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार कऱणे आणि ते परदेशात पाठवणे तसेच अभिनेत्रींना धमकावणे यासाठी राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये मोठी खळबळही उडाली होती. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं राज कुंद्राला दिलासा दिला आहे. याशिवाय मॉडेल शर्लिन चोप्रा, पुनम पांडे आणि उमेश कामत यांना देखील जामीन दिला आहे.

Also Read: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

कोर्टानं कुंद्रा प्रकरणातील संशयित आरोपींना सांगितले आहे की, त्यांनी पोलिसांना तपासामध्ये जे सहकार्य हवे आहे ते त्यांनी करावे आणि गरज पडल्यास तपासामध्ये सहभागीही व्हावे असे म्हटले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केले होते. त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, राजनं मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओ शुट केले होते.

ते व्हिडिओ शुट केल्यानंतर त्यानं ते ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील विकले होते. राज कुंद्राशी काही परदेशी कंपन्याशी डीलही झाली होती. राजचे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मात्र शिल्पाला मोठा धक्का बसला होता. राज काय करत होता यापैकी मला काहीही माहिती नव्हते. मात्र नेटकऱ्यांनी शिल्पाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: माझ्या मुलाची राख चोरीला गेली... गोकर्ण जंगलाच्या गुहेत सोपडलेल्या रशियन महिलेचा धक्कादायक आरोप!

Success Story: 'अंध प्रियांका बनली महसूल सहाय्यक'; परिस्थितीशी दोन हात करत यशाला गवसणी, शेणोलीतील युवतीची प्रेरक कहाणी

Nagpur News: जन्मठेपेच्या कैद्याने कारागृहात संपवलं जीवन

100 टक्के मतदार, 'ती' 14 गावं लवकरच महाराष्ट्रात घेणार; सीमाभागातील गावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’तून शेतीसाठी पाणी; डाव्या-उजव्या कालव्यांतून विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT