Raj Kundra 
मनोरंजन

राज कुंद्राला दिलासा नाहीच; २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत वाढ

राज कुंद्रा, रायन थार्पला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितनिर्मिती आरोपप्रकरणी अटकेत असलेल्या व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. राजला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज (शुक्रवारा) त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयासमोर केली असता ती मान्य करण्यात आली. राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांची २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

राज कुंद्रा आणि रायन थार्पचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला असून त्यातील डेटामधून हॉटशॉट्स या अ‍ॅपचे ५१ व्हिडीओ हाती लागले. तर हॉटशॉट्स हे अ‍ॅप डेव्हलप करणाऱ्या साक्षीदाराने ते अश्लील असल्याची माहिती दिली. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर रायन थार्पने मोठ्या प्रमाणात डेटा नष्ट केला होता. युट्यूबने या अ‍ॅपवरून डाऊनलोड केलेले व्हिडीओ नष्ट करून हे अ‍ॅप युट्यूबवर बंद केल्याची नोटिस बजावली होती. ती नोटिस पोलिसांच्या हाती लागली आहे. 'एच अकाऊंट', 'एच ऑपरेशन' आणि 'एच टेक्निकल' या तीन व्हॉट्सअप ग्रुपमधील व्यक्तींची चौकशी होणे गरजेचे आहे. राज कुंद्राच्या येस बँकमधील खात्यात नियमितपणे मोठ्या प्रमाणात परदेशातून रक्कम जमा झाली आहे. या रकमेचाही तपास करणं गरजेचं आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोर्टात केली.

फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान राज कुंद्राचं नाव समोर आलं. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी हे जामिनावर मुक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

सिनेमापलीकडचा माणूस! जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीसाठी अल्लू अर्जुनने पुन्हा म्हटला 'पुष्पा'चा डायलॉग

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

SCROLL FOR NEXT