raj shilpa
raj shilpa 
मनोरंजन

राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीला कोट्यवधींचं नुकसान

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितनिर्मिती उद्योजक आणि अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी गुन्हे शाखेने अटक केली. राज सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी शिल्पाच्या जुहू इथल्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी त्यांनी शिल्पाचाही जबाब नोंदवून घेतला. या सर्व प्रकरणामुळे शिल्पाला व्यावसायिक पातळीवर मोठा फटका बसला आहे. 'सुपर डान्सर ४' हा रिअॅलिटी शो तिच्या हातून निसटण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन आठवड्यांतील एपिसोडमध्ये ती गैरहजर राहिली. यामुळे तिचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. (Raj Kundra Porn Case Shilpa Shetty To Face Financial Losses Claim Reports slv92)

राजच्या अटकेनंतर शिल्पाने बाहेर कुठेही जाणं किंवा शोमध्ये झळकलं टाळलं आहे. 'सुपर डान्सर ४' या रिअॅलिटी शोचं परीक्षण शिल्पा करत होती. मात्र गेल्या दोन एपिसोड्समध्ये ती गैरहजर राहिल्याने करिश्मा कपूर आणि रितेश-जेनेलिया यांनी तिची जागा घेतली. 'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा आणखी काही आठवडे शोमध्ये गैरहजर राहणार आहे. यामुळेच तिला जवळपास दोन कोटी रुपये गमवावे लागणार आहेत.

शिल्पाने हा शो सोडला अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र निर्मात्यांना तिला शोमधून काढून टाकायचे नाही. शिल्पा प्रत्येक एपिसोडसाठी १८ ते २२ लाख रुपये मानधन घेते. या शोचे आठवड्यातून दोन एपिसोड प्रसारित होतात.

जबाब नोंदवत असताना राजवर ओरडली शिल्पा

पोलिसांकडे जबाब नोंदवत असताना शिल्पाला रडू कोसळलं होतं. 'अशी कामं करायची गरज काय होती', असं विचारत ती सातत्याने राजवर ओरडत होती. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाची प्रतिमा मलिन होत असून अनेक जाहिरातीच्या ब्रँड्सनी माघार घेतल्याचं ती राजला सांगत होती. 'इंडिया टुडे'नं यासंदर्भातील वृत्त दिलं. राज कुंद्राच्या अश्लील चित्रफीतनिर्मिती व्यवसायाबद्दल माहिती नसून त्यात माझी कोणतीच भूमिका नसल्याचं शिल्पाने पोलिसांना स्पष्ट केलं. 'इरॉटिका हे पॉर्नपेक्षा खूप वेगळं आहे आणि पती राज कुंद्राचा पॉर्न फिल्मनिर्मितीत समावेश नव्हता', असं म्हणत शिल्पाने राजचा बचावही केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT