Raj Kundra And Shilpa Shetty Raj Kundra Sparks Divorce Rumour With Shilpa Shetty  Esakal
मनोरंजन

Raj Kundra Shilpa Shetty Separation: "आम्ही वेगळे झालोय", शिल्पा अन् राज कुंद्राने घेतला घटस्फोट? 'त्या' ट्विटमुळे चर्चेला उधाण

राज कुंद्राने त्याच्या UT 69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. दरम्यान, राजने एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे.

Vaishali Patil

Raj Kundra Sparks Divorce Rumour With Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा सध्या त्याच्या आगामी सिनेमा UT69 चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या राजचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो चित्रपटाबाबत आणि त्याच्या फॅमिलीबाबत बोलताना दिसत आहे. मात्र ट्रेलर रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी राज कुंद्राने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

ही पोस्ट वाचल्यानंतर त्याच्यासह शिल्पाच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज कुंद्राने सोशल मीडियावर वेगळे होणार झाल्याची घोषणा केली आहे. यानंतर मात्र शिल्पाच्या चाहत्यांना काळजी वाटतेय की शिल्पा आणि राज वेगळे होत आहेत.

राज कुंद्राने रात्री 1 वाजता हे ट्विट केले आहे. "आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात तुम्ही आम्हाला वेळ द्यावा ही विनंती", असे त्याने या ट्विटमध्ये लिहिले आहे.

मात्र राजने आपल्या ट्विटमध्ये काही गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या नाहीत. राज नक्की कोणापासून वेगळा झालाय? हे ट्विट कुणाबद्दल आहे? आणि शिल्पाचा या प्रकरणासोबत काही संबध आहे का? असे अनेक प्रश्न या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत. त्यामुळे चाहते याबाबत वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

तर राज कुंद्राची ही पोस्ट चित्रपटासाठी प्रमोशन स्टंट असू शकते. राज कुंद्राच्या या पोस्टवर चाहत्यांच्याही प्रतिक्रियाही येत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, 'वेगळे झालो म्हणजे… घटस्फोट?' तर दुसऱ्याने लिहिले, तो त्याच्या मास्कबद्दल बोलत असावा. तर एकानं याला 'पब्लिसिटी स्टंट' अशी कमेंट केली आहे.

मात्र यावर शिल्पानं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा शिल्पाच्या प्रतिक्रियेकडे लागल्या आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा विवाह नोव्हेंबर 2009 मध्ये झाला. त्यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाले आहेत. दोघेही बऱ्याच कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देताना दिसतात. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे.

तर दुसरीकडे राज कुंद्राच्या UT69 या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटात त्याने आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या दिवसांची स्टोरी सांगण्यात आली आहे. राजला जुलै 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. दोन महिने राज तुरुंगात राहिला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT