Raj Kundra And Shilpa Shetty  Esakal
मनोरंजन

Raj Kundra : 'आत्महत्या करायला निघालो होतो, पण....'! शिल्पाच्या पतीनं राजनं केला धक्कादायक खुलासा

अश्लील चित्रपट तयार करुन ते परदेशात पाठवणे या कारणामुळे प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती.

युगंधर ताजणे

Raj Kundra Shilpa Shetty Husband interview : राज कुंद्राला त्या घटनेपासून सारा देश ओळखू लागला. त्यानंतर त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. तिला खूप मानसिक त्रासही सहन करावा लागला होता.

अश्लील चित्रपट तयार करुन ते परदेशात पाठवणे या कारणामुळे प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. तो काही दिवस तुरुंगात देखील होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली आहे. जामिनासाठी देखील त्याला मोठा संघर्ष करावा लागला होता. दरम्यान शिल्पा शेट्टीला नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी देखील ट्रोल केले होते. राजच्या घटनेचा परिणाम तिच्या करिअरवर झाला होता.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

देशातल्या १९८ श्रीमंत लोकांमध्ये राज कुंद्राच्या नावाचा समावेश आहे. सध्या राज हा त्याच्या युटी ६९ नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याचे प्रमोशनही जोरदार सुरु आहे. राजच्या काही दिवसांपूर्वीच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली होती. आम्ही आता एकत्र राहणार नाही..अशा आशयाचे ट्विट करुन त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता राजनं एनबीटीला दिलेल्या एका मुलाखतीतून मोठा खुलासा केला आहे.

पॉर्नोग्राफी केससंबंधी राजला तुरुंगात दोन महिने राहावं लागले होते. दोन वर्षांपासून राज राहिला आहे. राजनं जेव्हा या साऱ्या घटनेवर चित्रपट बनवण्याचा विचार केला तेव्हा शिल्पानं त्याला चप्पल देखील फेकून मारली होती. असेही त्यानं त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. आता त्यानं आपण आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. पण त्यानंतर जे घडलं यामुळे निर्णय बदलल्याचे राजनं सांगितले आहे.

राज म्हणतो, लोकांना मी उद्योगपती झालेला दिसतो पण त्यामागील माझी मेहनत किती आहे याचा लोकं विचार करत नाही. माझे वडील बस कंडक्टर होते. मी टॅक्सी चालवून स्वताला घडवले आहे. मी जेव्हा तुरुंगात गेलो तेव्हा माझ्या मुलांवर झालेला परिणाम किती गंभीर स्वरुपाचा होतो हेही तुम्हाला माहिती नाही. मला सगळीकडे मास्क लावून फिरावे लागत होते. खरं काय कारण आहे कुणालाच माहिती नाही.

अशा परिस्थितीत मला स्वताला संपवावे असे वाटू लागले. मनात आत्महत्येचे विचार येत होते. शिल्पासोबत दहा दिवस बातचीत झाली नव्हती. पण तिचा मला फोन आला. ती म्हणाली तू काळजी करु नकोस. मी तुझ्यासोबत आहे. आणि मला खूप आधार मिळाला. या शब्दांत राजनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT