raj kundra
raj kundra  
मनोरंजन

शिल्पाच्या पतीचा खुलासा; "पहिल्या पत्नीचं मेहुण्यासोबत होतं अफेअर"

स्वाती वेमूल

व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra याने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या एका मुलाखतीवर मौन सोडलं आहे. या मुलाखतीत राजची पूर्वाश्रमीची पत्नी कविता हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर आरोप केले आहेत. राजसोबत घटस्फोट घेण्यासाठी शिल्पा कारणीभूत होती, असं तिने यात म्हटलंय. मात्र राजने हे आरोप फेटाळले असून विभक्त होण्यामागचं कारण काय होतं, हे सांगितलं आहे. लंडनमध्ये राहत असताना कविताचं त्याच्या बहिणीच्या पतीसोबत अफेअर असल्याचा खुलासा, राजने केलं आहे. इतकंच नव्हे, तर शिल्पा शेट्टीच्या विरोधातील मुलाखतींसाठी तिने हजारो पाऊंड खर्च केल्याचा आरोपही राजने केला आहे. (Raj Kundra slams ex wife Kavita after her viral Shilpa Shetty video)

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत राज म्हणाला, "घरात मी आई-बाबा, बहीण आणि मेव्हण्यासोबत राहायचो. त्याला युकेमध्ये व्यवसाय करायचा होता, म्हणून बहिणीसोबत तो आमच्या घरातच राहत होता. त्यावेळी कविताने त्याच्यासोबत जवळीक साधली. मी जेव्हा बिझनेस ट्रिपला जायचो, तेव्हा ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायची. माझ्या कुटुंबीयांना आणि ड्राइव्हरलाही त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची शंका होती. नंतर माझी बहीण आणि मेहुणा भारतात परतले, पण तेव्हासुद्धा कविताचा त्याच्याशी संपर्क होता. बाथरुममध्ये तिने एक फोन लपवला होता आणि त्याद्वारे ती त्याच्याशी संपर्क साधत होती."

या घटनेनंतर राजच्या बहिणीने तिच्या पतीला आणखी एक संधी दिली आणि राजने पत्नीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पत्नीचं विवाहबाह्य संबंध असला तरी त्यात बहिणीचा विषय होता, म्हणून कविताच्या मुलाखतींवर उत्तर न देण्याचं ठरवलं होतं, असं राजने सांगितलं. "शिल्पासाठी हे सगळं खूप कठीण होतं पण तिने मला आणि माझ्या परिस्थितीला समजून घेतलं. माझ्या आयुष्यातील त्या वाईट काळात तिने माझी साथ दिली. मी नक्कीच काहीतरी चांगले कर्म केले असेन, ज्यामुळे मला शिल्पासारखी पत्नी भेटली", असं राज पुढे म्हणाला.

'डेली मेल'ला दिलेल्या मुलाखतीत राजची पूर्वाश्रमीची पत्नी कविता म्हणाली होती, "मी राज आणि शिल्पाचे फोटो पाहिले होते. एकीकडे मी लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे तो सतत शिल्पाच्या संपर्कात होता. घटस्फोटाच्या वेळीसुद्धा मी त्याला दुसरं लग्न करणार का असा प्रश्न विचारला असता त्याने उत्तर देणं टाळलं होतं." तर दुसरीकडे राजच्या घटस्फोटावेळी त्याला ओळखतंही नसल्याचं शिल्पाने स्पष्ट केलं होतं.

राज आणि कविता यांनी २००३ मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये राजने शिल्पा शेट्टीसोबत लग्न केलं. राज आणि शिल्पाला दोन मुलं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT