Raj Thackeray, uddhav thackreay, khupte tithe gupte SAKAL
मनोरंजन

Khupte Tithe Gupte: काय माहीत कोणी विष कालवलं.. उद्धवच्या आठवणीत राज ठाकरे भावुक

या प्रोमोत अवधुत गुप्तेने राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे भावुक झालेले दिसले.

Devendra Jadhav

Khupte Tithe Gupte Raj Thackeray News: खुपते तिथे गुप्ते शो चा नवीन सिझन सुरु होतोय. या सीझनमध्ये राज ठाकरे सहभागी झाले आहेत. अवधूत गुप्ते अनेक गोष्टींच्या बाबतीत राज ठाकरेंना बोलतं करणार आहेत. राज ठाकरे सुद्धा अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देणार आहेत. या शोचा नवीन प्रोमो समोर आलाय. या प्रोमोत अवधुत गुप्तेने राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे भावुक झालेले दिसले.

(raj thackeray get emotional after see uddhav thackeray photos in khupte tithe gupte )

खुपते तिथे गुप्ते शो मध्ये राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचे अनेक फोटो दाखवण्यात आले. या फोटोत उद्धव आणि राज हे भाऊ सोबत दिसत आहेत. अगदी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत या दोघा भावांचा अंदाज दिसत आहे. काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून असा प्रश्न अवधूत गुप्तेंनी राज ठाकरेंना विचारला. तेव्हा राज ठाकरे काही क्षण शांत झालेले दिसत आहेत.

पुढे गुप्तेंनी राज ठाकरेंना बोलतं केलं. राज फोटोंकडे बघत म्हणाले..."खूप छान दिवस होते ते. काय माहित कोणी विष कालवलं. किंवा कोणाची नजर लागली. असं राज ठाकरे म्हणाले. शेवटी गुप्तेंनी प्रश्न विचारला. आता पुन्हा एकत्र येऊ शकत नाही? या प्रश्नावर राज ठाकरे काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष आहे. खुपते तिथे गुप्ते शोचा हा भाग ४ जूनला रविवारी ९ वाजता बघायला मिळेल.

झी मराठीवर लवकरच येत्या ४ जून पासून 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम सुरु होत आहे. या कार्यक्रमाचा हा नवा सिझन आहे.

याआधी देखील कार्यक्रमाचा निवेदक अवधुत गुप्तेनं आपल्या प्रश्नांनी आलेल्या गेस्टना की हसवलं,कधी रडवलं तर कधी भावूक होऊन अनेक खुलासे करण्यास भाग पाडलं.

त्यामुळे अर्थातच हा कार्यक्रम पुन्हा सुरु होतोय म्हटल्यावर यंदा कोण पाहुणे असणार,कसा भाग रंगणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होतीच. राज ठाकरे यांच्या उपस्थितीने 'खुपते तिथे गुप्ते' च्या नवीन सिझनचा शुभारंभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT