Raj Thackeray MNS Chief Pune Function  esakal
मनोरंजन

Raj Thackeray : मी पाहिलेली सर्वात भ्रष्टाचारी ग्रामपंचायत! राज ठाकरे यांना आठवला शोले, कुणाचं घेतलं नाव?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जे मार्गदर्शन केले ते चर्चेत आले आहे.

युगंधर ताजणे

Raj Thackeray MNS Chief Pune Function : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जे मार्गदर्शन केले ते चर्चेत आले आहे. राज यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी काळात ग्रामपंचायतीबाबत आणखी गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. त्या ग्रामपंचायती स्वच्छ आहेत की नाही याची काळजीही घ्यावी. असेही सांगितले आहे.

राज यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपण आपल्या आजवरच्या शालेय जीवनात पाहिलेल्या सर्वाधिक भ्रष्ट ग्रामपंचायतीचा उल्लेखही केला. याप्रसंगी त्यांनी रमेश सिप्पी यांच्या शोले या चित्रपटातील रामगड गावाच्या ग्रामपंचायतीचा उल्लेख केला. त्यामध्ये त्यांनी त्या गावातील पाण्याची टाकी आणि त्या गावात असणारा ठाकूर याविषयी भाष्य केले. रामगडमधील तो एकमेव ठाकूर आणि त्याच्या घरात लाईट नाही. मात्र त्याच गावात पाण्याची मोठी टाकी आहे.

रामगडमधील पाण्याच्या टाकीत पाणी पोहणार कसं, त्यामुळे मला ती आजवर पाहिलेली सर्वात भ्रष्टाचारी ग्रामपंचायत वाटते. असे राज यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यावेळी राज यांनी त्या मेळाव्यातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेबाबत काही महत्वाच्या सुचनाही केल्या.

यावेळी राज यांनी सर्वाधिक स्वच्छ ग्रामपंचायतीसाठी निधीही जाहीर केला आहे. गावातील शहरात आणि शहरतील परदेशात जातात. त्याचे कारण सभोवतालचे वातावरण. गावातील वातावरण चांगल ठेवणं हे पहिल काम करा. असा सल्ला राज यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT