maharashtra shahir, maharashtra shahir teaser, maharashtra shahir news, shahir sable family  SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shahir: अंकुशबद्दल मला शंका कारण.. शाहीर साबळेंच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरी बद्दल राज ठाकरेंचे परखड मत

Raj Thackeray News: महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर राज ठाकरेंच्या हस्ते लाँच झाला

Devendra Jadhav

Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर लाँच काल २० मार्चला रिलीज झाला. मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत या सिनेमात झळकणार आहे.

मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर आयुष्यभर जपणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर राज ठाकरेंच्या हस्ते लाँच झाला.

(raj thackeray talks about ankush chaudhari he playing shahir sable in maharashtra shahir movie)

या टिझर सोहळयात राज ठाकरेंनी त्यांच्या खास अंदाजात सगळ्यांसमोर त्यांचं मत व्यक्त केलं. यावेळी राज ठाकरेंनी शाहिरांबद्दल वक्तव्य केलं कि,"शाहिरांनी मी लहानपणापासून पाहत आलो आहे.

ते आमच्या घरी माननीय बाळासाहेबांना भेटायला यायचे. मला ते 'जय जय महाराष्ट्र माझा ...' वाले शाहीर म्हणून माहीत होते.

पण शाहीरांबद्दल एक गोष्ट सांगतो, की जे ठराविक लोक बाळासाहेबांना ' बाळ' म्हणायचे त्यात एक शाहीर होते. आज बायोपिक बरेच येतात.

त्यासाठी तो माणूसही तसा असावा लागतो. पण शाहिरांच्या या जीवनपटात एकेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे येत जातात. "

अंकुश चौधरीच्या भूमिकेत असलेल्या शाहीर साबळेंबद्दल राज ठाकरे म्हणाले, "या चित्रपटात प्रत्येक फ्रेमसाठी विशेष प्रयत्न केल्याचे जाणवते.

केदार शिंदे यांनी जेव्हा मला या चित्रपटाबद्दल सांगितले तेव्हा मी त्यांना विचारले की शाहिरांनी भूमिका कोण करतोय.

त्यांनी जेव्हा अंकुशबद्दल सांगितले तेव्हा मी थोडीशी साशंकता व्यक्त केली. पण टिझर पाहिल्यावर नक्की सांगू शकतो की, अंकुश ने उत्कृष्टपणे शाहीर उभे केले आहेत."

‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे!

या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT