rajan patil marathi actor bad health condition post on social media working with dr shriram lagoo vikram gokhale SAKAL
मनोरंजन

Rajan Patil: पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था; डॉ. लागूंसोबत काम केलेला मराठी अभिनेता दुर्धर आजाराने ग्रस्त

ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांनी त्यांना झालेल्या दुर्धर आजाराची करुण कहाणी सोशल मिडीयावर शेअर केलीय

Devendra Jadhav

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी काही दिवसांपुर्वी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. तर दुसरीकडे स्वप्नील रास्ते या मराठी व्यावसायिकाने कात्रजला राहणाऱ्या एका राजकारण्याने पैसे बुडवले म्हणुन तक्रार केली.

अशातच डॉ. लागू, मधुकर तोरडमल अशा दिग्गजांसोबत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांनी त्यांना झालेल्या दुर्धर आजाराची करुण कहाणी सोशल मिडीयावर शेअर केलीय.

(rajan patil marathi actor bad health condition post on social media)

स्टार नाही झालो पण सुजाण, संवेदनशील अभिनेता

राजन पाटील यांचा नुकताच १३ ऑगस्टला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने राजन पाटील म्हणतात... टाइम्स मधील नोकरी गेल्यानंतर मी माझ्या आवडत्या अभिनय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. सुदैवाने लोकांनी मला अभिनेता म्हणून स्वीकारले. डॉ. लागू, प्रा. मधुकर तोरडमल, विक्रम गोखले, अशा मोठ्या रंगकर्मी बरोबर काम करून त्यांची शाबासकी मिळवली. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं, ज्याचं मोल नाही करता येणार. या व्यवसायाने मला प्रसिद्धी मिळाली. मराठी दूरदर्शन मालिकांमुळे मी लोकांच्या घराघरात पोहचलो. स्टार नाही झालो पण सुजाण, संवेदनशील अभिनेता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. आणखी काय हवं !

राजन पाटलांना झालाय हा दुर्धर आजार

पुढे राजन पाटील प्रकृतीबद्दल सांगतात, आयुष्याच्या या प्रवासात माझ्या प्रकृतीवर खूप आघात झाले. गूढ ( ज्याचं कारण किंवा नाव मला अद्यापही माहीत नाही ) आजार,पोलिओ, टायफॉइड,कॅन्सर, अनेक रस्ता अपघातांमुळे झालेली हाडांची मोडतोड अशा अनेक आजारांशी लढलो आणि त्यांना पिटाळून लावले. आतापर्यंत माझी अकरा ऑपरेशन्स झाली आहेत. म्हणजे गंमत बघा मी फक्त नाटकाच्या थिएटरवर प्रेम केलं असं नाही तर तितकेच प्रेम ऑपरेशन थिएटर वर सुद्धा केले. आता गेली दहा वर्षे मी पार्किन्सन्स या आजाराशी लढतोय. लढाई कठीण आहे. पण लढणे हा माझा हक्क आहे, माझा स्वभाव आहे. या लढाईत तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची मला गरज आहे. त्या तुमच्याकडून मिळतील याची मला खात्री आहे. गेली तीन वर्षं माझ्या अभिनयाच्या क्षेत्रापासून मी दूर आहे. पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था झालीय. पुन्हा कार्यरत होण्याची जबरदस्त इच्छा आहे. बघुया ...

राजन पाटलांची बायको आईसारखी सेवा करतेय

राजन पाटील शेवटी सांगतात, कौटुंबिक पातळीवरही मी समाधानी आहे. पत्नी उजू आता माझी आई झालीय. माझी खूप काळजी घेते. म्हणजे मी जागेवर पडून वगैरे नाहीय, हिंडता फिरता आहे. पण औषधांचा प्रभाव आहे तोपर्यंत. तो प्रभाव ओसरला की नंतर काही खरे नाही. पण मी त्याची काळजी करत नाही. ..... या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मुलगा, मुलगी , सून, जावई, माझा भाऊ, बहीण, माझी नातवंडे सदैव माझी काळजी घेतात. हे सुख आणि समाधान सगळ्यांच्या नशिबात नसते. माझ्या या आजारपणामुळे एक गोष्ट झाली. मला आपलं कोण हे समजले.जे माझे आहेत असे मला वाटत होते ते लोक हळूहळू दूर झाले. आणि जे खरंच माझे आहेत ते अधिक जवळ आले. अर्थात याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. असा मी, राजन पाटील. तुम्हाला माझ्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत, रंग माझा आणि माझी माणसं, ती वाचा. ती तुम्हाला नक्की आवडतील. पुस्तकांसाठी 9820213735 या नंबरवर संपर्क साधा. आता थांबतो. धन्यवाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT