rajanikanth 
मनोरंजन

रजनीकांतचा हा फोटो पुन्हा व्हायरल, चिमुकल्याला दिलं होतं प्रामाणिकपणाचं बक्षिस

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. एका लहान मुलासोबत रजनिकांतचा हा फोटो जवळपास दोन वर्षांपुर्वीचा आहे. या मुलाने त्याला सापडलेले 50 हजार रुपये असलेलं पाकिट प्रामाणिकपणे ज्याचे होते त्याला परत केले होते. मोहम्मद यासिन असं नाव असलेल्या त्या मुलाच्या या प्रामाणिकपणावर रजनीकांत खूश झाला होता. 

2018 च्या जुलै महिन्यातील हा फोटो आहे. तेव्हा इयत्ता दुसरीत शिकत असलेला यासिन त्याच्या शाळेत जात होता. त्यावेळी रस्त्यात त्याला एक पर्स सापडली होती. त्यात 50 हजार रुपये होते. यासिनने ती पर्स थेट शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिली आणि सांगितले की हे पैसे त्याचे नाहीत. मुख्याध्यापकांनी याची माहिती पोलिसांनी दिली आणि पैसे ज्याचे होते त्याच्यापर्यंत पोहोचवले. यासिनच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्याला विचारलं की तुला बक्षिस काय हवं? तेव्हा त्याने रजनीकांतला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

यासिनचा प्रामाणिकपणा आणि त्याने व्यक्त केलेली इच्छा याची माहिती रजनीकांत यांना होताच त्यांनी यासिनला भेटायचं ठरवलं. रजीनीकांतने यासिनसह त्याच्या कुटुंबाला घरी बोलावलं होतं. तेव्हा रजनीकांत यांनी मुलासह त्याच्या कुटुंबासोबत फोटोही काढले. 

रजनीकांत यांनी यासिनला भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना यासिनचं कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते की, आजकाल लोक काही पैशांसाठी एकमेकांना धोका देतात. अगदी एकमेकांच्या जीवावर उठतात. अशा वातावरणात यासिनने एक आदर्श समोर ठेवला आहे. आता पुन्हा एकदा रजनीकांत आणि यासिनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth highway:'शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको'; सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा..

Lionel Messi In India : लिओनेल मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार नाही; समोर आलं मोठं कारण...

Latest Marathi News Live Update : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलं

Land Fraud: प्लॉट विक्रीतून ५८ लाखांची फसवणूक; पडेगाव येथील प्रकार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कसा असेल तुमचा वर्षअखेरीचा महिना? (१ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५)

SCROLL FOR NEXT