Katrina Kaif Vicky Kaushal Marriage esakal
मनोरंजन

कतरिनानं 'या' चित्रपटात केलं होतं सासऱ्यांसोबत काम

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

Katrina Kaif Vicky Kaushal Marriage : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) आज 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झालीय. कतरिनाच्या हातावर विकी कौशलच्या नावाची मेहंदी रचली जाणार आहे. विकी-कतरिनानं शेवटच्या क्षणापर्यंत लग्नाचं गुपित ठेवले होतं. आज त्यांचा विवाह होत आहे.

कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील (Rajasthan) किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. फॅन्ससोबतच सेलेब्स देखील कॅट-विकीच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावरही #VicKat हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नाच्या बातम्यांदरम्यान एक बातमी अशीही येत आहे, ज्यानं चाहत्यांच्या उत्साहाची पातळी वाढवलीय.

कॅटनं सासऱ्यांसोबत केलं 'या' चित्रपटात काम

कतरिनानं कधीही विकी कौशलसोबत काम केलं नाही; पण तिनं विकीच्या वडिलांसोबत म्हणजेच, शाम कौशलसोबत (Sham Kaushal) काम केलंय. होय, दोघांनी फँटम (Phantom) चित्रपटात एकत्र काम केलंय. वास्तविक, हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान (Kabir Khan) यांनी केलं होतं, तर शाम कौशल या चित्रपटात अॅक्शन डायरेक्टर होते.

सेटवर कॅटचा झाला वाद

या चित्रपटात कतरिना रॉ एजंटची भूमिका साकारत होती. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि इतरांना शूट करण्याची संधी मिळते. मात्र, कतरिनाला लपावं लागतं. कॅट म्हणते, मी आणि सैफ जीपमध्ये आहोत आणि सीरियन सैन्य आमचा पाठलाग करतंय. याचवेळी गोळीबार सुरू होताच, मला लपून राहावं लागेल, असा सीन अॅक्शन डायरेक्टरने (शाम कौशल) सेट केला होता. ज्यानंतर कॅटनं युक्तिवाद केला, की ती एजंटच्या भूमिकेत आहे आणि ती लढू शकते. या प्रकरणावर वाद झाला, नंतर कबीर खान आणि इतरांनी कॅटच्या मुद्द्यावर सहमती दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT