Rajasthani singer Mame Khan is the first folk artist from India to walk the Cannes Red Carpet sakal
मनोरंजन

कान्स मध्ये जाणारा मामे खान ठरला पहिला लोककलावंत.. कोण आहे हा मामे ?

राजस्थानी गायक मामे खान कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालणारा भारतातील पहिला लोककलाकार ठरला आहे.

नीलेश अडसूळ

Cannes 2022 : फ्रान्स येथेहोणाऱ्या ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचा बहुमान प्रथमच एका लोककलावंताला मिळाला आहे. राजस्थानी गायक मामे खान (mame khan) यांनी मंगळवारी कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवत, कान्स मध्ये जाणारा भारतातील पहिला लोककलाकार म्हणून इतिहास घडवला.

मामे खान हे उत्कृष्ट गायक आहेत. शिवाय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या indian contingent मध्येही ते सहभागी आहेत. मामे यांच्यासह या महोत्सवात आर माधवन, रिकी केज, प्रसून जोशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, शेखर कपूर आणि अनुराग ठाकूर हे कान्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत . (Rajasthani singer Mame Khan is the first folk artist from India to walk the Cannes Red Carpet)

मामे खान यांनी आजवर 'लक बाय चान्स', 'आय ऍम', 'नो वन किल्ड जेसिका', 'मान्सून मँगोज', 'मिर्झिया' आणि 'सोनचिरिया' यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. कोक स्टुडिओ मधील गायक अमित त्रिवेदीसोबत त्यांनी केलेले सादरीकारण विशेष गाजले होते. यावेळी मामे यांनी पारंपारिक राजस्थानी पोशाख परिधान केला होता. उत्तम भरतकाम केलेले निळ्या रंगाचे जॅकेट आणि गुलाबी कुर्ता आणि डोक्यावर राजस्थानी फेटा असा खास पेहराव त्यांनी केला होता. मामे यांच्यासाठी अंजली चक्रवर्ती हिने हा पोशाख खास डिझाइन केला होता.

तमन्ना भाटिया, नयनतारा, पूजा हेगडे, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, नवाजुद्दीन सिद्दीकी, एआर रहमान, हिना खान, हेली शाह यांसारखे अनेक दिग्गज या (caness 2022) प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या महोत्सवात भारतीयांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT