rajiv son 
मनोरंजन

वाढदिवशीच मुलाचं निधन, प्रसिद्ध कॉमेडियन राजीव निगमची भावूक पोस्ट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं निधन झाले आहे. राजीव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. राजीव निगम यांचा मुलगा देवराज याचं ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले आहे. पण देवराजच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

कॉमेडियन राजीव निगम यांचा रविवार ८ नोव्हेंबर रोजी वाढदिवस देखील होता. त्यांच्या वाढदिवशीच दुर्देवाने त्यांच्या मुलाचं निधन झालं आहे. राजीव यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अतिशय भावूक होत लिहिलंय, ‘वाढदिवशी अशी भेट कोणी देतं का? माझा मुलगा देवराज आज मला सोडून गेला. माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच गेला’ असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

राजीव यांनी ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केलंय. तसंच 'कॉमेडी सर्कस के अजूबे', 'कॉमेडी सर्कस का जादू', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार', 'ये तो होना ही था' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

rajeev nigam son passed away know unknown facts about comedian  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT