Charu Asopa  Esakal
मनोरंजन

Charu- Rajeev Divorce: अखेर घटस्फोट झालाच! लग्नाच्या तीन वर्षातच सुष्मिता सेनच्या भावाचा संसार मोडला..

Vaishali Patil

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनहा त्याच्या वयक्तिक आयूष्यामुळे चर्चेत होता. राजीव सेन आणि चारू असोपा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही ठिक नव्हत. आता राजीव सेन आणि चारू असोपा यांचा दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे.

घटस्फोटानंतर राजीवने सोशल मीडियावर घटस्फोटासंदर्भात एक नोटही लिहिली होती. या जोडप्याला एक मुलगी Gianna देखील आहे. त्यात त्याने लिहिले की ते दोघेही मुलगी जियानाला एकत्र वाढवत राहतील.

8 जून रोजी म्हणजेच आजच त्यांच्या घटस्फोटाबाबत न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आणि त्यासोबतच न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

याबाबत राजीव म्हणाला की, 'आम्ही घटस्फोटित आहोत'. घटस्फोटानंतर सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने इन्स्टाग्राम स्टोरीवर चारूसोबतचा एक फोटो शेअर केला.

यासोबतच आता ते वेगळे झाले आहेत. राजीवने या नोटमध्ये लिहिले की, "कोणताही गूडबाय नाही. फक्त दोन लोक जे एकमेकांना सोबत धरुन चालू शकले नाहीत. प्रेम कायम राहील. आम्ही आमच्या मुलीचे नेहमीच आई आणि वडील राहू."

चारू असोपा आणि राजीव सेन यांनी 2009 मध्ये लग्न केलं. या लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये मतभेद झाले आणि राजीवने चारुला सोडलं.

दोघांनी आपलं नातं सुधारले आणि काही काळानंतर मुलगी जियाना त्यांच्या आयुष्यात आली. पण पुन्हा त्याच्यात मतभेद झाले. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. चारूने राजीववर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर यंदा प्रथमच वंदे मातरम्, पंतप्रधान मोदींचे सलग तेराव्यांदा ध्वजारोहण

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT