rajesh shrungarpure in daddy esakal news
rajesh shrungarpure in daddy esakal news 
मनोरंजन

अर्जुन रामपालच्या 'डॅडी'मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मराठी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडून हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. राजेश शृंगापुरे हे मराठी सिनेजगतातलं नावाजलेलं नाव आपल्याला आता बॉलिवूडमध्येही पाहायला मिळणार आहे. अर्जुन रामपाल याचा बहुचर्चित 'डॅडी' या सिनेमात राजेश महत्वाची भूमिका साकारणार आहे. 

'स्वराज्य', 'संघर्ष' यांसारख्या अनेक मराठी सिनेमात राजेश अनेक चांगल्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. 'झेंडा' या सिनेमातल्या त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खुप कौतुक केले. राजेश शृंगारपूरे आपल्याला कायम धडाकेबाज भूमिका साकारताना दिसले.  राजेश यांनी मराठीसोबतच 'सरकार राज', 'मर्डर थ्री' या हिंदी सिनेमात देखील कामे केली.  मराठी तसेच हिंदी सिनेमा असो किंवा छोटा पडदा असो ही दोन्ही माध्यमे गाजवलेल्या राजेश यांनी दोन हॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. त्याच्या या सिनेमातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. 'डॅडी' या सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी त्याने मौन राखणेच पसंत केले. 'अरुण गवळी' यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या डॅडी या सिनेमात राजेश शृंगारपुरे एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT