Rajinikanth Latest News Rajinikanth Latest News
मनोरंजन

Rajinikanth : रजनीकांत झाले आजोबा; मुलगी सौंदर्याने दिला मुलाला जन्म

आई झाल्याची बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे

सकाळ डिजिटल टीम

Rajinikanth Latest News साउथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. रजनीकांत (Rajinikanth) आजोबा झाले आहे. रजनीकांत यांची मोठी मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा आई झाली आहे. सौंदर्याने मुलाला जन्म दिला आहे. सौंदर्या रजनीकांतने नवजात मुलाचे नावही चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

सौंदर्या रजनीकांतने आई झाल्याची बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये सौंदर्याने चाहत्यांना छोट्या राजकुमारची झलकही दाखवली आहे. मात्र, तिने बाळाचा चेहरा दाखवला नाही. बाळाचा हात धरलेला हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे. याशिवाय सौंदर्याने मॅटर्निटी शूटचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सौंदर्या बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.

सौंदर्या रजनीकांतने फोटोसोबत एक खास नोटही लिहिली आहे. ‘विशगन, वेद आणि मी वेदचा धाकटा भाऊ वीर रजनीकांत वनागामुडीचे स्वागत केले आहे. सौंदर्याने बाळाचे नाव वीर रजनीकांत वनागामुडी असल्याचे सांगितले.

सौंदर्या रजनीकांतच्या पोस्टला हजारो युजर्सने लाईक केले आहे. बाळाच्या जन्मानंतर सर्वजण तिचे अभिनंदन करीत आहेत. एका युजरने लिहिले, क्यूट सुपरस्टार आहे. दुसऱ्याने लिहिले, खूप खूप अभिनंदन. २०१९ मध्ये सौंदर्या आणि विशगन यांचे लग्न झाले. वीर हे तिचे दुसऱ्या लग्नातील पहिले अपत्य आहे.

यापूर्वी सौंदर्याचा विवाह अश्विन रामकुमारशी झाला होता. त्याच्यापासून सौंदर्याला पहिला मुलगा वेद झाला. सौंदर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. कोचादईयान हा तिच्या दिग्दर्शकीय पदार्पण होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT