Rajinikanth-CM Yogi: Rajinikanth reaches Lucknow, to watch Jailer with CM Yogi Adityanath  Esakl
मनोरंजन

Rajinikanth-CM Yogi: थलायवा रजनीकांत घेणार योगी आदित्यनाथ यांची भेट! जेलरच्या यशाबाबत दिली प्रतिक्रिया

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमध्ये भेट घेणार आहेत

Vaishali Patil

Rajinikanth reaches Lucknow, to watch Jailer with CM Yogi Adityanath: सुपरस्टार रजनीकांत याचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. याचा अंदाज त्याच्या चित्रपटाच्या कलेक्शनवरुनच येतो. रजनी यांचा 'जेलर' हा चित्रपट सध्या बॉक्स धुमाकूळ घालत असून त्याचा परिणाम सनी देओल आणि अमीषा पटेलच्या गदर 2 वरही झाला आहे.

सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाने भारतात 300 कोटींची कमाई केली नसली तरी जगभरात या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई आणि क्रेझ पाहता हा चित्रपट आणखी अनेक रेकॉर्ड करेल अशी अपेक्षा आहे.

'जेलर' चित्रपटाच्या यशाने निर्माते खुश आहेत. तर रजनीकांत सध्या देवदर्शनाला गेले आहेत. रजनीकांत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कसलीही कमी सोडतांना दिसत नाही आहे. या संदर्भात आता ते लखनौला पोहोचले आहेत.

लखनौला ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. इतकच नाही तर मुख्यमंत्र्यांना 'जेलर' चित्रपटही दाखवणार आहेत.

शुक्रवारी रजनीकांत हे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पोहचले. तिथे पोहचताच त्यांनी मीडियाशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्याचा 'जेलर' चित्रपट पाहणार आहेत.

चित्रपटाच्या यशावर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ' हा सर्व देवाचे आशीर्वाद.' रजनीकांत सध्या अनेक शहरांना भेट देत आहेत. ते आता लखनौमधील काही अध्यात्मिक स्थळांनाही भेट देणार आहेत.

हिमालयापासून त्यांनी त्यांच्या धार्मिक यात्रेला सुरुवात केली असून त्यानंतर त्यांनी झारखंड येथील छिन्नमस्ता मंदिरात देखील देवाचे दर्शन घेतले. तिथले त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्याच्या जेलर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’मध्ये या चित्रपटात रजनीकांतसोबतच रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि कॉमेडियन योगी बाबू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

तर रजनी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते आता त्याच्या आगामी चित्रपटासाठी देखील चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिग्गज अमिताभ बच्चन हे देखील काम करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT