Rajinikanth Jailer Movie Actor meets Akhilesh Yadav esakal
मनोरंजन

Rajinikanth On Akhilesh : 'अखिलेशची अन् माझी जुनी मैत्री', रजनीकांत यांना म्हणायचयं तरी काय?

रजनीकांत हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी देखील ओळखले जातात. काल त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.

युगंधर ताजणे

Rajinikanth Jailer Movie Actor meets Akhilesh Yadav : सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर नावाचा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीचा विषय आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं दोनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. एकीकडे सनी देओलच्या गदर २ ने मोठे विक्रम केले असताना त्यापुढे रजनी यांच्या जेलरनं स्वताची वेगळी छाप उमटवली आहे.

रजनीकांत हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी देखील ओळखले जातात. काल त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. योगींच्या पाया पडतानाचा रजनी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुन सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियाही तीव्र होत्या. यानंतर रजनी यांनी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

रजनी यांच्या व्हायरल ट्विटनं आता वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी अखिलेशचं कौतूक केलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मी नऊ वर्षांपूर्वी अखिलेशला भेटलो होतो. त्यानंतर बऱ्याच वर्षात त्याच्याशी भेट आणि बोलणे झाले नाही. आम्ही फोनवर एकमेकांच्या संपर्कात होतो. मुंबईतील एका कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटलो होतो. तिच आमची शेवटची भेट होती.

मी एकदा उत्तर प्रदेशमध्ये शुटींगच्या निमित्तानं आलो होतो तेव्हाही त्याला भेटणे झाले नाही. आता मी त्याला भेटणार आहे. आमची जुनी मैत्री आहे. असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. त्यांच्या त्या प्रतिक्रियेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी त्यावर रजनीकांत यांचे हे वक्तव्य राजकीय तर नाही ना असा प्रश्न उभा केला आहे. काही महिन्यांपूर्वी रजनीकांत हे एका वेगळ्या राजकीय पक्षाची निर्मिती करणार असे म्हटले होते.

रजनीकांत यांनी नंतर एका जाहीर सभेमध्ये आपण कोणत्याही प्रकारे राजकीय व्यवस्थेचा भाग होणार नाही. हे स्पष्टही केले होते. आता त्यांनी अखिलेश यादव यांच्याविषयी केलेलं वक्तव्य मात्र चर्चेत आलं आहे. सध्या रजनीकांत यांचा जेलर चित्रपट तुफान कमाई करताना दिसतो आहे. त्यानं बॉक्स ऑफिसवर हंगामा केला आहे. अशातच रजनी यांच्या उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT