Rajinikanth Lal Salaam new promo  esakal
मनोरंजन

Rajinikanth’s Moideen Bhai : वाढदिवशी रजनीकांत यांचा 'लाल सलाम'! चाहत्यांना अनोखं गिफ्ट, 'मोईद्दीन भाई' चा स्वॅगच वेगळा

भारतीय चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या जन्मदिनी चाहत्यांना एक आगळी वेगळी भेट दिली आहे.

युगंधर ताजणे

Rajinikanth Lal Salaam new promo : भारतीय चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या जन्मदिनी चाहत्यांना एक आगळी वेगळी भेट दिली आहे. त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा लाल सलाम नावाच्या चित्रपटातील त्यांचा प्रोमो समोर आला असून तो चर्चेत आहे.

थलायवा यांची बातच काही और आहे. त्यांच्या कुठल्याही नव्या चित्रपटाची होणारी चर्चा हा वेगळाच विषय असतो. या वर्षी त्यांचा जेलर नावाचा चित्रपट आला होता. त्यात त्यांनी साकारलेली निवृत्त जेलरची भूमिका प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होती. आता त्यांच्या आगामी लाल सलाम चित्रपटाविषयी बोललं जातं आहे.

रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या हिनं त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार ए आऱ रहमान यांनी केले आहे. सोशल मीडियावर या प्रोमोनं नेटकऱ्यांना अन् चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. रहमान यांच्या जलाली जलाली गाण्यानं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे.

चाहत्यांनी रजनी यांच्या लाल सलाममधील तो लूक पाहिल्यावर मुक्तकंठानं त्यांची प्रशंसा केली आहे. रजनीकांत यांच्यासारखा दुसरा कुणी नाही. त्यांनी या चित्रपटामध्ये कमाल केली आहे. त्यांची स्टाईल, त्यांचा स्वॅग हे सारं काही वेगळच असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. लाल सलाम हा दोन समुहामधील संघर्ष दर्शवणारा चित्रपट असून त्यात क्रिकेट हा महत्वाचा मुद्दा आहे.

त्यामध्ये रजनीकांत यांच्याबरोबर विष्णु विशाल आणि विक्रांत यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रजनी यांनी मोईद्दीन भाई यांची भूमिका वठवली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच भूमिकेचं आणि त्यांच्या त्या हटके लूकचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

रजनीकांत यांच्याबरोबरच विष्णु विशाल, विक्रांत हे देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सेंथिल, लिव्हिंगस्टोन आणि के एस रवीकुमार देखील या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. तसेच विवेक प्रसन्ना, थंबी रमिहा, निरोशा आणि धन्या बालक्रिश्नन यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा कॅमिओ या चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

लाल सलाम हा पुढील वर्षी पोंगलच्या वेळेस प्रदर्शित होणार आहे. लायका प्रॉडक्शनच्या वतीनं प्रदर्शित केला जाणार आहे. जेलर नंतर रजनीकांत यांच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT