Rajkumar Hirani Dunki Director Comment on Animal actor Ranbir  esakal
मनोरंजन

Rajkumar Hirani : 'रणबीर'ला घेऊन पुन्हा चित्रपट करणार? काय म्हणाले 'डंकी'चे दिग्दर्शक

रणबीर कपूरला घेऊन राजकुमार हिरानी यांनी २०१८ मध्ये संजू नावाचा चित्रपट केला होता.

युगंधर ताजणे

Rajkumar Hirani Dunki Director Comment on Animal actor Ranbir : रणबीर कपूरला घेऊन राजकुमार हिरानी यांनी २०१८ मध्ये संजू नावाचा चित्रपट केला होता. रणबीरच्या आय़ुष्यातील एक महत्वाचा चित्रपट म्हणून संजूकडे पाहिले जाते. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित त्या बायोपिकमध्ये रणबीरनं अफलातून काम केले होते.

आता रणबीर आणि राजकुमार हिरानी हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. इंडिया टुडेनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. सध्या रणबीर हा त्याच्या अॅनिमल चित्रपटावरुन चर्चेत आहे तर हिरानी यांचा डंकी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलनं आतापर्यत ८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

हिरानी यांच्या डंकीनं तीनशे कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचे दिसून आले आहे. शाहरुख खान, तापसी पन्नु, विकी कौशल, विक्रांत कोचर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या डंकीतून हिरानी यांनी नेहमीप्रमाणे एका वेगळ्या विषयावर भाष्य केल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांना देखील या चित्रपटानं भुरळ घातली आहे. शाहरुखच्या त्यातील भूमिकेवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

त्या मुलाखतीमध्ये हिरानी यांनी आगामी काळातील वेगवेगळ्या प्रोजेक्टविषयी सांगितलं आहे. त्यात त्यांना आपल्याला भविष्यात रणबीर सोबत पुन्हा काम करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हिरानी यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. ते म्हणाले, रणबीर हा माझा नेहमीच आवडीचा अभिनेता राहिला आहे. तो गुणी कलाकार आहे.

रणबीरविषयी काय म्हणाले हिरानी?

मी जेव्हा रणबीरला घेऊन संजू केला होता तेव्हाच मला त्याच्यातील गुणवत्ता कळली होती. तो एक प्रतिभावान अभिनेता आहे. माझ्या अतिशय जवळचा आहे. सध्या माझ्याकडे दोन ते तीन स्क्रिप्ट आहेत. आणि मी रणबीरच्या संपर्कात आहे. त्याच्याशी बोलणही सुरु आहे. पाहुया काय होतं ते, जर सगळ्या गोष्टी जमून आल्या तर तो प्रोजेक्ट नक्की मार्गी लागेल.

तुम्ही जेव्हा एखाद्याला डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट लिहिता ठेवता तेव्हा ती स्क्रिप्ट कुठे जाईल आणि काय आकार घेईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे त्या त्या परिस्थितीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. रणबीर हा माझा नेहमीच आवडीचा कलाकार राहिला आहे.अशा शब्दांत हिरानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT