Rajpal Yadav On His Mother esakal
मनोरंजन

Rajpal Yadav On His Mother : 'बाळा असं किती दिवस तू...' राजपालच्या आईनं स्पष्टच सांगितलं

राजपाल यादवनं त्याला मिळेल त्या चित्रपटांमध्ये प्रभावीपणे काम केले आहे.

युगंधर ताजणे

Rajpal Yadav Reveals Why His Mother Didnt Watch Film : बॉलीवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव हा नेहमीच त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यानं त्याच्या अभिनयानं वेगळी ओळख इंडस्ट्रीमध्ये तयार केली आहे. राजपालचा प्रवास काही सोपा नव्हता. पाठीशी कुणीही गॉडफादर नसताना त्यानं तयार केलेली स्वताची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

राजपाल यादवनं त्याला मिळेल त्या चित्रपटांमध्ये प्रभावीपणे काम केले आहे. त्यानं त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला. यासगळ्यात एका मुलाखतीमध्ये राजपाल यादवनं त्याच्या आजवरच्या प्रवासाविषयी भाष्य केले आहे. त्यात त्यानं आपल्या घरच्यांना आपल्या भूमिकेबद्दल कशाप्रकारे कॉम्प्लेक्स होता याविषयी सांगितलं आहे. त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर कसा झाला याबद्दल त्यानं बिनधास्तपणे सांगितले आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वोत्तम विनोदी अभिनेत्यांमध्ये राजपाल यादवच्या नावाचा समावेश होतो. त्यानं आजवर ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत त्या प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांना देखील राजपाल यादवच्या भूमिकेनं प्रभावित केले होते. यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून रणवीर सिंग या कलाकारांचा समावेश आहे.

राजपालनं आपले काम आईला कसे वाटते याविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. आई माझे चित्रपट पाहत नाही. तिला ते आवडत नाही. यावेळी राजपालनं हंगामा नावाच्या चित्रपटाशी संबंधित एक प्रसंग सांगितला आहे. २००३ मध्ये आलेल्या या चित्रपटानं राजपाल यादवला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. जेव्हा राजपालच्या आईनं त्याचा हंगामा नावाचा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. तेव्हा राजपाल यांना वाईट वाटले होते. कारण त्यात राजपालला मारण्याचे काही प्रसंग होते.

बाळा तुला चित्रपटामध्ये मार खाताना का दाखवतात, ते पाहताना वाईट वाटते. आता तरी तू काही वेगळ्या भूमिका कर. असा सल्ला माझ्या आईनं मला दिला होता. ती लोकं चित्रपटात तुझी किती धुलाई करतात ते मला काही पाहवत नाही. असे आईनं मला म्हटले होते. त्यानंतर मी आईला काही गोष्टी समजावून सांगितले होते. चित्रपट हिट व्हावा यासाठी काही प्रसंग त्यामध्ये टाकले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT