Rajpal Yadav  esakal
मनोरंजन

Rajpal Yadav :सांगलीत राजपाल यादवचं 'काम चालू आहे' ! व्यापाऱ्याच्या भूमिकेत दिसणार

सध्या राजपाल यादव हा त्याच्या एका चित्रपटातील भूमिकेमुळे ट्रेंडचा विषय होतो आहे.

युगंधर ताजणे

Kaam Chalu Hai : बॉलीवूडमध्ये आपल्या विनोदी अभिनयानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. राजपाल यादवनं त्याचा वेगळा प्रेक्षकवर्ग केला आहे. ९० च्या दशकानंतर विनोदी कलाकारांची जी परंपरा खंडित झाली होती ती पुढे नेण्याचे काम राजपालनं केले आहे.

सध्या राजपाल यादव हा त्याच्या एका चित्रपटातील भूमिकेमुळे ट्रेंडचा विषय होतो आहे. यापूर्वी देखील राजपालनं वेगवेगळ्या भूमिका साकारून आपण किती व्हर्सेटाईल अभिनेते आहोत हे दाखवून दिले होते. त्याच्या व्हायरल झालेल्या मुलाखतीतून राजपालनं आपल्या कुटूबियांविषयी सांगितले होते. मी कायम विनोदी भूमिका करणे हे त्यांना आवडत नाही. चुप चुपके नावाच्या चित्रपटामध्ये मी सहकलाकारांकडून चित्रपटामध्ये खूप मार खाल्ला होता.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

चुपचुपके चित्रपटावरुन राजपालच्या आईनं त्याला तू नेहमीच मार खातो कधीतरी हिरो हो असे म्हटले होते. यानंतर मी काही वेगळ्या भूमिकांचा विचार केला त्यानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्याचे राजपालनं म्हटले आहे. यासगळयात आता राजपालचा नवा चित्रपट येतो आहे. त्याचे नाव काम चालू आहे असे आहे. त्याच्या पोस्टरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजपालची या चित्रपटामध्ये काय भूमिका असणार याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला असून राजपालच्या पाठीमागे सांगलीचा बोर्ड दिसून येतो. राजपाल हा सध्या सांगलीमध्ये चित्रिकरणासाठी आला असून त्याची जोरदार चर्चाही सुरु आहे. पलक मुच्छलचे भाऊ पलश मुच्छल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT