Raju Srivastav Health Update News
Raju Srivastav Health Update News Raju Srivastav Health Update News
मनोरंजन

Raju Srivastav Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर

सकाळ डिजिटल टीम

Raju Srivastav Health Update News कॉमेडियन राजू श्रीवास्तवला (Raju Srivastav) हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. आता पुन्हा एकदा राजू श्रीवास्तवचा ताप वाढला आहे. त्यामुळे राजूला व्हेंटिलेटरवर टाकले आहे. राजूला व्हेंटिलेटरवरून (Ventilator) न काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) सध्या शुद्धीवर आहे. राजूच्या हात-पायांची हालचाल थोडी वाढली आहे. मंगळवारी त्याला काही काळ व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. राजू श्रीवास्तव ८०-९० टक्के नैसर्गिक ऑक्सिजन स्वतः घेत आहे. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.

२५ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आला होता. राजू श्रीवास्तवच्या हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य आहे. राजू २३ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे. ९ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव दिल्लीतील इरॉस हॉटेलमध्ये थांबला होता. तो हॉटेलच्या बाहेर जीममध्ये व्यायामासाठी गेला होता.

व्यायाम करताना तो पडला आणि छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर जिममध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला तातडीने एम्समध्ये दाखल केले. २३ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यानच्या काळात त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. आता त्याला पुन्हा व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवल्याची माहिती आहे. राजू लवकर बरा व्हावा यासाठी चाहते सतत प्रार्थना करीत आहेत.

कॉमेडियन असण्यासोबतच राजू अभिनेता देखील आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजूची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. राजू श्रीवास्तवने अनेक कॉमेडी शो केले आहेत. यामध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महा मुकाबला, कॉमेडी सर्कस आणि कॉमेडी नाइट्स विथ कपिल यांचा समावेश आहे. राजूच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबासह देश प्रार्थना करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT