Raju Srivastav Latest News  Raju Srivastav Latest News
मनोरंजन

Raju Shrivastava : राजूचे कुटुंब पोहोचले गुरुद्वारात; सुनील पाल म्हणाला...

राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनीही याबाबतची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे

सकाळ डिजिटल टीम

Raju Shrivastava Health Update लाफ्टर चॅम्पियन (Comedian) राजू श्रीवास्तवच्या (Raju Srivastav) उत्तम आरोग्यासाठी सर्वजण प्रार्थना करीत आहेत. आज सकाळी राजूच्या कुटुंबीयांनी एम्सजवळील गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली. ‘कुटुंबातील सदस्य एम्समध्ये आहेत. राजूभाईंची अवस्था आजही तशीच होती. काल प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. देशातील लाखो लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असताना आम्हीही देवाकडे प्रार्थना करीत आहोत’, असे राजूच्या भावाचा मेहुणा प्रशांतने सांगितले.

राजूचा धाकटा भाऊ देखील दिल्लीतील रुग्णालयात दाखल आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना राजू रुग्णालयात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिलेली नाही, असे प्रशांतने सांगितले. शुक्रवारी राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत काही सुधारणा झाल्याचे वृत्त आले होते. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तवला औषधे दिल्यानंतर काही सकारात्मक चिन्हे दिसली आहेत. तो अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. त्याचा मेंदू प्रतिसाद देत नाही आहे. राजू श्रीवास्तवच्या मेंदूवर उपचाराचा विशेष परिणाम होत नाही आहे.

राजू श्रीवास्तवच्या (Raju Srivastav) कुटुंबीयांनीही याबाबतची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कुटुंबीयांनी निवेदनात लिहिले आहे की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. डॉक्टरांची टीम जबाबदारीने प्रकृतीची काळजी घेत आहे. तुमच्या अखंड प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार. अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका. कृपया राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा’

मोदी-योगींनी केली विचारपूस

राजू श्रीवास्तवला १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील हॉटेलच्या जिममध्ये हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला होता. यानंतर त्याचे प्रशिक्षक दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेऊन गेले होते. राजूच्या मुलीने सांगितले होते की, तिच्या मनावरही याचा मोठा प्रभाव पडला आहे. त्याचवेळी राजूचा भाऊ काजू श्रीवास्तवची पत्नी श्रेया हिने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजूची पत्नी शिखाकडून प्रकृतीची विचारपूस केली.

प्रकृतीत सुधारणा

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सुधारणा होण्याची गती कमी आहे. मात्र, सुधारणा होत आहे, अशी माहिती राजूच्या कुटुंबीयांकडून प्राप्त झाली आहे. लवकरच राजू बरा होईल, असे सुनील पाल म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT