Raju Srivastava Death: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीला मोठा झटका लागला आहे. तर कुटुंबप्रमुख गेल्यानं श्रीवास्तव यांचे कुटुंब पूर्ण कोलमडून गेलं आहे. पत्नी शिखा, मुलगी अंतरा आणि कुटुंबातील इतर लोक गेल्या ४२ दिवसांपासून देवाजवळ राजू बरे होण्याची प्रार्थना करत होते. २० सप्टेंबरपर्यंत कुटुंबाच्या लोकांना विश्वास होता की राजू बरे होतील पण नियतीला काहीतरी वेगळच मंजूर होतं. राजू यांच्या निधनानंतर पत्नी शिखा श्रीवास्तव रडून रडून बेहाल झाल्या आहेत. त्यांना सांभाळणं देखील कठीण होतंय असं जवळच्या सूत्रांकडून कळलं आहे.(Raju srivastava wife shikha cries inconsolably on his death says he fought very hard)
शिखा श्रीवास्तव दिवस-रात्र ही एकच अपेक्षा मनात बाळगून होत्या की त्यांचा आयुष्यभराचा सोबती बरा होऊन घरी परतेल. शिखा ४२ दिवस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात राजू श्रीवास्तवांसोबतच होत्या. त्यांना राजू यांचा चेहरा तर पहायला मिळायचा पण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्या तरसल्या होत्या. शिखा वाट पाहत होत्या की राजू श्रीवास्तव यांना शुद्ध येईल आणि ते डोळे उघडतील. बरे होऊन आपल्यासोबत घरी येतील. पण राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आणि त्यासोबत शिखा यांचा विश्वासही हरला.
शिखा श्रीवास्तव यांची राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. त्या म्हणाल्या,''मी आता बोलायच्या मनःस्थितीत नाही आहे. मी काय बोलू आता? ते शेवटपर्यंत लढले. मला देखील आशा होती. प्रार्थना करत होते की ते या सगळ्यातून बेर होतील,आणि घरी परततील. पण असं झालं नाही. बस्स,मी आता एवढंच सांगेन की ते लढवय्ये होते''.
राजू श्रीवास्तव यांचा भाचा कुशल श्रीवास्तव आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड डॉ. अनिल मुरार्का गेल्या दीड महिन्यांपासून सतत एम्सला जात होते आणि राजू यांच्या प्रकृतीची अपडेट घ्यायचे. कुशल म्हणाला की, ''राजू श्रीवास्तव यांचे निधन त्यांना दुसरा हार्टअटॅक आल्यानं झालं आहे. २० सप्टेंबर पर्यंत त्यांना विश्वास होता की राजू बरे होतील,कारण गेल्या दीड महिन्यापासून ते मृत्यूशी झुंज देत होते''.
राजू श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनेत्याच्या रुपात केली होती. सुरुवातीला ते बॉलीवूडच्या सिनेमातून छोट्या-मोठ्या व्यक्तिरेखा साकारायचे. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरमध्ये सलमान खान,शाहरुख खान,जॉनी लिव्हर,रविना टंडन सारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये भाग घेतल्यानंतर राजू श्रीवास्तव घराघरात ओळखले जाऊ लागले. त्यांनी कॉमेडीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण सगळ्यांना हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी या जगाचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव १० ऑगस्ट पासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वेंटिलेटरवर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.