rakesh jhunjhunwala passed away:  esakal
मनोरंजन

Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवालांचा रोल केला, 'मालामाल' झाला!

भारताचे वॉरेन बफेट म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या राकेश झुनझुनवालांचे आज निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

युगंधर ताजणे

Rakesh jhunjhunwala passed away: भारताचे वॉरेन बफेट म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या राकेश झुनझुनवालांचे आज निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्यान भारतीय शेअर (Tv Entertainment News) मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राकेश यांची प्रकृती खालावली होती. त्यांना वारंवार रुग्णालयात (Social media news) तपासणीसाठी नेण्यात आले होते. असे सुत्रांनी सांगितले. राकेश हे भारतीय शेअर मार्केटमधील मोठं नावं होतं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासगळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम 1992 वेबसीरिजची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

स्कॅम 1992 ही मालिका शेअर मार्केटमधील सर्वात मोठा भागीदार आणि घोटाळेबाज हर्षद मेहता याच्या आयुष्यावर आधारित होती. ती भूमिका प्रतिक गांधीनं साकारली. त्याच्या या भूमिकेचं मोठं कौतूकही झालं होतं. त्याच मालिकेत काही दृष्यांमध्ये राकेश झुनझुनवाला देखील दिसले होते ती भूमिका केविन दवे नावाच्या कलाकारानं साकारली होती. झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यानं एक खास पोस्ट करुन अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. केविननं मोठ्या कौशल्यानं राकेश यांची भूमिका साकारली होती.

भलेही केविनच्या वाट्याला फारशी भूमिका आली नसेल मात्र जेवढ्या सीनमध्ये तो दिसला त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी काही चित्रपटांमध्येही केविननं काम केले आहे. मात्र स्कॅम 1992 ने त्याला अमाप लोकप्रियता दिली आहे. भारतीय ओटीटी मनोरंजन विश्वात ज्या सर्वोत्तम मालिकांची नावं घेतली जातात त्यात स्कॅम 1992 ही मालिका आघाडीवर आहे. या मालिकेची लोकप्रियता तुफान होती. त्याला मिळालेला प्रतिसादही तितकाच प्रचंड होता. प्रेक्षकांना शेअर मार्केट आणि त्याच्याभोवतीचं वेगळं जग अनुभवता आलं होतं.

केविननं जेव्हा झुनझुनवालांची भूमिका साकारली तेव्हा तो एकदम लाईमलाईटमध्ये आला. त्यानं दिलेल्या मुलाखतीतून आपल्याला त्या रोलसाठी काय खास तयारी करावी लागली याविषयी सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर केविन आणि राकेश झुनझुनवाला यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला आहे. केविन झुनझुनवाला यांची भूमिका करुन केवळ लोकप्रियच झाला असे नाही तर मालामालही झाला असे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT