Rakhi Sawant Google
मनोरंजन

डोक्यावर पीसं लावून फिरताना दिसली राखी; आदिवासींनी थेट पोलिस ठाण्यात नेलं

अभिनेत्री राखी सावंतविरोधात रांचीच्या एसटी-एससी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) विरोधात रांचीच्या एसटी-एससी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रिय सरना समितीनं ही तक्रार केली आहे. राखी सावंतने बेली डान्सच्या ड्रेसला आदिवासी पोशाख संबोधित केलं होतं. या तक्रार दाखल केलेल्या समितीचं म्हणणं आहे की,राखीनं बेली डान्सच्या ड्रेसला आदिवासी लोकांच्या पोशाखाची उपमा देऊन एकप्रकारे अश्लीलतेची हद्द पार केली आहे. त्याचं झालं असं की,राखी सावंतचं नवं गाणं 'मेरे वरगा' लवकरच रिलीज होणार आहे. या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी राखी सावंतनं आपल्या ड्रेसला आदिवासी आऊटफिट म्हटलं आहे. सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता,ज्यामध्ये बेली ड्रेसमधील आपल्या लूकचा संबंध तिनं आदीवासींच्या पोशाखाशी जोडला. या व्हिडीओतील राखीच्या लूकला पाहून ट्रोलर्सनी देखील तिच्यावर निशाणा साधला होता.

राखी सावंतला 'एंटरटेन्मेंट क्वीन' म्हणून संबोधलं जातं. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कायम नेटकऱ्यांचं मनोरंजन करीत असे. पण अनेकदा ती आपल्या फॅशनच्या अर्धवट ज्ञानामुळे मर्यादा ओलांडतानाही दिसते. काही दिवसांपूर्वी राखीनं एक असा आऊटफिट्स घातला होता,जो पाहून चाहत्यांची हसून हसून पुरती वाट लागली.

Rakhi Sawant accused of insulting tribal women, case registered in SC / ST police station

न्यूड रंगाचा खुप साऱ्या झालर असललेला मिनी स्कर्ट,स्टोन स्टडेड बिकिनी टॉप आणि डोक्यावर पिसांनी भरलेला मुकूट अशा लूकमध्ये राखी सावंत दिसली होती. आपल्या या लूकमध्ये डान्स करत ती म्हणाली होती,''हा माझा आदिवासी लूक''. यानंतर ट्रोलर्सनी वेगवगेळ्या प्रतिक्रिया नोंदवत राखी सावंतची खिल्ली उडवायला सुरवात केली. एका नेटकऱ्यानं लिहिलं होतं,'उर्फी जावेदची पू्र्वज आहे वाटतं राखी सावंत आणि आता हे तिनंच सिद्ध केलं आहे'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं की,'आलियाच्या लग्नात आदिवासीला डान्स करण्यासाठी बोलावलं आहे वाटतं,हुबा हुबा बाबूसा'

राखी सावंत काही दिवस आधी रणवीर सिंगसोबत रेड कार्पेटवर डान्स करताना दिसली होती,ज्याचीही बरीच चर्चा रंगली होती. एका कार्यक्रमात राखीनं असा काही ड्रेस घातला होता ज्यामुळे ती स्वतः अनकम्फर्टेबल दिसली होती. सारखं आपला स्कर्ट सावरण्याकडे तिचं लक्ष होतं. आमिर खानसोबतही तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. राखी सावंत नेहमीच तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी ट्रोल होताना दिसते. पण आता ट्रोल होण्यासोबतच कोर्टात केसही सुरु झाली यामुळे मात्र राखीची पंचाईत झाली असेल हे नक्की. आदिवासींना डिवचणं राखीला चांगलंच महाग पडणार असं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

Viral Video: दुकानात केळी पाहून छोट्या हत्तीला पडली भुरळ पण आईने तिथेच दिली चांगुलपणाची शिकवण, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश, तहसीलदाराचे निलंबन

AUS vs IND, 4th T20I: दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला, मग अभिषेक शर्मा बरसला; पण ऍडम झाम्पाला षटकारानंतर काटा काढला

T20I World Cup 2026: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आणखी एक वर्ल्ड कप फायनल; पाच शहरांमध्ये होणार सामने...

SCROLL FOR NEXT