rakhi sawant adil khan durrani controversy Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: 'तू कसा फसला रे भावा!' राखीवर आरोप करणारी शर्लिन आदिलच्या सपोर्टला...

राखी सावंत आणि आदिल खान दुर्राणी यांच्यात सुरू असलेल्या वादावर अभिनेत्री शर्लिन चोप्राने आपले वक्तव्य केले असून तिने आदिलचं समर्थन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या मनोरजंन जगतात राखी सावंतची जास्त चर्चा आहे. सोशल मिडिया उघडताच राखीचे व्हिडिओ दिसणार नाही असं होऊ शकत नाही. तिने मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर राखी सावंतचा पती आदिल दुर्राणी याला ओशिवरा पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. आता त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अनेक कलाकार राखीच्या सपोर्टमध्येही आले आहेत. मात्र सोशल मिडियावर फक्त राखीचीच बाजू दाखवली जात आहे असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. राखीने अदिलवर बरेच आरोपही केले आहेत. त्याने तिला फसवलं तिच्या कडून पैसे घेतले, त्याचे अनेक मुलींशी संबंध आहेत. तिने मिडियासमोर अनेक पुरावेही सादर केले आहेत.

आता मात्र अशी एक व्यक्ती समोर आली आहे ज्याने आदिलची बाजू घेतली आहे. ती व्यक्ती म्हणजे शर्लिन चोप्रा. शर्लिन तिचं जिने राखीवर तिच्याविषयी अश्लील शब्द वापरल्याचं आणि तिची बदनामी करण्याचा आरोप करत तिच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती आणि त्यानंतर पोलिसांनी राखीला अटक केली होती.

आता शर्लिननं आदिलची बाजू घेत म्हटलं की, 'आदिल बद्दल मी इतक तर सांगू शकते की, तो मला खुप समजूतदार वाटला. त्याला मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा मी त्याला बोललेही की तु असा कसा फसला या सर्व प्रकरणात..त्याला मी माझा भाऊ मानते. त्यामुळे त्याच्याबद्दल ऐकल्यावर वाईट वाटतयं. या संपूर्ण प्रकरणामध्ये तो कसे अडकला आणि हेडलाइन बनवण्यासाठी या लोकांनी एकमेकांशी भांडणे किंवा त्यांच्या नात्याची खिल्ली उडवणे आवश्यक नाही.तो खरचं दोषी असल्यास त्याने ते मान्य करावं नसंल तर त्याने याबाबत बोलावं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT