rakhi sawant adil khan news
rakhi sawant adil khan news  esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: राखीशी प्रेमप्रकरण, आदिलला एक्स गर्लफ्रेंडकडून आत्महत्येची धमकी

युगंधर ताजणे

Tv Entertainment News: बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. केवळ आपल्या (bollywood drama queen rakhi sawant) अघळपघळ बोलण्यामुळे तिनं बिग बॉसच्या फायनलिस्टमध्ये जागा मिळवली होती. तो सीझन लोकप्रिय करण्यात राखीचा मोठा वाटा होता. तिला काही विजेतेपद मिळवता आलं नाही. मात्र आपल्या रागीट स्वभावामुळे तिनं नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यावेळी (Bigg boss) राखीनं आपला पती म्हणून त्या शोमध्ये आणले होते. त्यावरुन खळबळ उडाली होती. आता राखीची अशीच एक बातमी व्हायरल झाली आहे.

सध्या राखी ही तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे. त्याचे नाव आदिल (adil khan) खान असे आहे. तो राखीच्या प्रेमात पडला आहे. उद्योगपती असणाऱ्या आदिलला राखीच्या प्रेमात पडणं महागात पडल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या राखीचे आणि आदिलचे फोटो व्हायरल झाले असून ते पाहिल्यावर राखीच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. आदिलनं एका मुलाखतीच्या निमित्तानं आपण राखीच्या प्रेमात पडल्यानंतर मोठा खुलासा केला आहे. तो खुलासा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्याबाबतीतला होता.

त्या मुलाखतीमध्ये आदिलनं राखीसोबतच्या रिलेशनशिपविषयीचा खुलासा केला होता. तर राखीनं बिनधास्तपणे आपण आदिलच्या प्रेमात असल्याचे म्हटले होते. तिनं कारणही सांगितलं होतं. मी आणि आदिल एकमेकींना डेट करतो म्हणून आदिलच्या एक्स गर्लफ्रेडनं आत्महत्येची धमकी दिली होती. आदिलनं देखील या घटनेचा उल्लेख केला होता. राखी म्हणाली, माझं आदिलवर प्रेम आहे. आणि मला माहिती आहे की, तो देखील माझ्यावर प्रेम करतो. सध्या आमच्यातील संबंध दुरावले आहे. त्याचे कारण त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. तिनं आमच्या प्रेमात अडथळे निर्माण केले आहेत. एका दिवशी आदिलला फोन करुन तर दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ शेयर करुन आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

आता आदिलची एक्स गर्लफ्रेंड मला फोन करुन सांगते की, आदिल तुझा त्याच्या स्वार्थासाठी उपयोग करुन घेत आहे. तू त्याला सोडून टाक, तो अजुनही माझ्यावर खूप प्रेम करतो. मला माहिती आहे की, माझी अनेक प्रेमप्रकरणं ही यशस्वी झालेली नाही. त्यामुळे हे नातं मला टिकवायचं आहे. मात्र आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडच्या वागण्यानं मला वाईट वाटले आहे. प्रेमप्रकरणाच्या बाबत मी दुर्देवी आहे की काय असे वाटू लागले आहे. तिच्यामुळे मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. मला माहिती नाही की, आम्हाला काय करावे लागेल. माझा आदिलवर विश्वास आहे. तो मला निराश करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT