rakhi sawant dances in breakup party on divorce with adil khan video viral netizens react  Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: हिला पहिली बाहेर काढा! राखीचा धिंगाणा, सोसायटीतील लोकं संतापली

Vaishali Patil

Rakhi Sawant Celebrate Her Divorce: राखी सांवत अन् ड्रामा हे समीकरण सगळ्यानाच माहित आहे. ती नेहमीच काहीतरी विचित्र हावभाव करत असते. राखी सांवत हे बॉलिवूड मधलं असं नाव आहे.

ती नेहमी चर्चेत राहण्यासाठी काहीही करते. तिचे व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

आता तिने नुकतच असं काही केलं आहे की त्यामुळे पुन्हा सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. राखी लाल लेहेंगा परिधान करुन नाचताना दिसली.

यावेळी तिने तिचा आदिल खानसोबतच घटस्फोटाचा निर्णय अंतिम टप्यात असल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत लाल रंगाचा लेहेंगा परिधान करुन ढोल-ताशांच्या आवाजावर जोरदार नाचताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, 'होय मी शेवटी घटस्फोट घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी होतात पण मी आनंदी आहे... चला सुरुवात करू.' असं म्हणत राखी डोक्यावर ओढणी घेते आणि जोरजोरात नाचू लागते.

याव्हिडिओत राखी खुपच आनंदी दिसते. आता राखीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. नेटकरी तिला ट्रोलही करत आहे.

घटस्फोटाचा आनंद साजरा केल्यानंतर राखी पुन्हा तिच्या अपार्टमेंटमध्ये गेली. यादरम्यान, जेव्हा ती लिफ्ट येण्याची वाट पाहत होती.

तेव्हा सोसायटीतील एक सदस्य संतापला आणि त्यांने सिक्युरिटीला विचारलं की तुम्ही इतक्या मीडियावाल्यांना आत कसं येऊ दिले.

त्यानंतर तो माणूस म्हणाला, 'हा काय मूर्खपणा आहे, मीडियाचे इतके लोक इथे का आहेत आणि सुरक्षेने त्यांना परवानगी कशी दिली? त्यांना जायाला सांगा.'

राखीने 'ETimes' ला दिलेल्या मुलाखतीत सांगतिल की तिला इमारतीतील लोक नेहमीच त्रास देतात आणि ती फक्त मजा करण्याचा आणि ढोल वाजवण्याचा प्रयत्न करत होती कारण तिने आदिलला घटस्फोट दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daund ZP Election Result : दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ पैकी ६ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले

Pune Crime : फसवणुकीच्या गुन्‍ह्यात पसार झालेल्या पोलिस हवालदारास आंध्रप्रदेशातून अटक

Chandrakant Patil : राज्यातील विरोधकांची ताकद संपली; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पंतप्रधान मोदींनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार, म्हटले ''पुन्हा एकदा...''

Vihamandava News : विहामांडवा जि.प. गटात शिवसेनेचा झंझावात; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदला

SCROLL FOR NEXT