rakhi sawant, rakhi sawant marriage SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant: माझा नवरा परत आला!. राखीचा ड्रामा संपला पण नेटकऱ्यांनी झाडलं, 'तुझी फालतूची नाटकं...'

राखीने आदिलबद्दल पुन्हा एकदा एक खुलासा केला

Devendra Jadhav

Rakhi Sawant Wedding: सध्या राखी सावंत तिच्या लग्नासंबंधी बातम्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच राखीच्या आईचं निधन झालं. राखीच्या आईच्या निधनानंतर पुन्हा एकदा राखीचं लग्न चर्चेत आलं. गेल्या काही दिवसांपासून राखी आणि आदिलचं लग्नाच प्रकरण फार गाजतंय. राखीने काही दिवसांपूर्वी आदिलवर गंभीर आरोप केलेले. "अगदी त्याला मी सोडणार नाही", अशा शब्दात बोलून राखी आदिलवर भडकली.

(Rakhi sawant drama is over, but the netizens troll rakhi and her husband adil khan duranni )

आता पुन्हा एकदा राखी चर्चत आली आहे. राखी नुकतीच मीडियासमोर आली. आणि तिने आदिलबद्दल पुन्हा एकदा एक खुलासा केला,"आता माझा आदिल माझ्याकडे परत आलाय. माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद आलाय. आम्ही दोघे आता एकत्र येऊन खूप काम करणार आहोत. आमच्या दोघांचं नातं चांगलं आहे. आता कोणतीही गडबड होणार नाही. मी माझ्या नवऱ्याला बदनाम करणार नाही. तो माझाच आहे आणि माझ्याशिवाय तो कोणाकडे जाणार नाही"

राखीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिला चांगलं झोडलं आहे. "जेवढा पेट्रोलचा भाव बदलत नाही तेवढा तुझा आदिल बदलतो". "हा आदिल आहे कि WIFI जो सारखा येऊन जाऊन असतो", "राखी तू तुझ्या आदिलला घेऊन कोणत्या तरी गुहेत जा, तुझी रोजची नाटकं बघुन कंटाळा आला.." "हिची फालतूची नाटकं बंद होत नाहीत.." अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी राखीला चांगलंच फैलावर घेतलं

गेल्या काही दिवसापुर्वी राखीनं प्रियकर आदिलसोबतच्या लग्नाचा खुलासा केला. व्हिडीओ आणि फोटो शेअर करून राखीने आदिलसोबत लग्न केल्याचा पुरावाही सादर केला. मात्र आदिलने याबद्दल बोलणं टाळलं. त्यामुळे तो या लग्नापासून खुश नसल्याचं बोललं जात होतं. त्यातच आदिलने शेवटी मौन सोडलं आणि सोशल मीडियावर पोस्ट करून राखी सोबत झालेल्या लग्नाचा स्वीकार केला.

आता राखीच्या आयुष्यात आदिल परत आलाय. त्यामुळे आतातरी राखीचा सुखाचा संसार सुरु होईल, अशी तिच्या फॅन्सना आशा आहे. राखी जेव्हा बोलत होती तेव्हा तिच्या बाजूला बिग बॉस मराठी ४ मधला तिचा खास मित्र विकास सावंत सुद्धा उपस्थित होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शतक झळकावल्यावर विराट कोहलीचा मैदानावर नागीण डान्स, Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : दिल्ली विमानतळावरून पुण्याकडे येणारे इंडिगो कंपनीचे विमान कोल्हापूरतच अडकले

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन; ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल अन्... 'अशी' होती कारकिर्द

Bharat Taxi Launch : झिरो कमिशनसोबत ‘भारत टॅक्सी’ सेवा लॉन्च; मिळणार अल्प दरात राइड्स, जाणून घ्या दर आणि बुकिंग प्रक्रिया

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

SCROLL FOR NEXT