Rakhi Sawant, Rakhi Sawant news, Rakhi Sawant video, Rakhi Sawant affair, Rakhi Sawant wedding, Rakhi Sawant breakup SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant Video: अबब..! राखी सावंतने एअरपोर्टवर केला नाश्ता अन् बसला ६०० रुपयांचा फटका.. काय घडलं बघा

राखीने एअरपोर्टवर वर असं काय केलं की तिला थेट ६०० रुपयांचा फटका बसला

Devendra Jadhav

Rakhi Sawant News: राखी सावंतचं नाव घेतलं कि आठवतं तो म्हणजे तिने केलेला ड्रामा. राखी सावंतने तिच्या आजवरच्या आयुष्यात अनेक ड्रामे केले. लग्न, आईचा मृत्यू, घटस्फोट, प्रेमभंगावर आधारित नवीन गाणं अशा अनेक गोष्टी मधल्या काळात राखीने केल्या.

राखीने आता एक नवीन ड्रामा केलाय. ते सुद्धा एअरपोर्टवर. राखीने एअरपोर्टवर वर असं काय केलं की तिला थेट ६०० रुपयांचा फटका बसला. आम्ही सांगतो.

(Rakhi Sawant had breakfast at the airport and was hit by Rs 600.. See what happened)

राखी सावंत कधी-कधी उपवास करत असल्याचे सांगते. कधीकधी ती म्हणते की तिचा उपवास तुटला आहे. आता राखीचा उपवास आहे कि नाही हे फक्त तिलाच माहित.

पण समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती विमानतळावरील एका रेस्टॉरंटमध्ये इडली-सांभार खाताना दिसत आहे. ती नाश्टा करत असल्याचे सांगत आहे.

इतकंच नाही तर ती ज्या दुकानातून खाद्यपदार्थ खरेदी करत आहे त्या दुकानदारालाही सांगते की तो खोटारडा करत आहे. का बाबा असं?

व्हायरल भयानीच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखी सावंत दुकानदाराला म्हणते - एक वडा आणि एक इडली द्या. मी विमानतळावर नाश्ता करत आहे. यानंतर दुकानदार त्यांच्याकडे पैसे मागून 600 रुपये झाल्याचं सांगतो.

तेव्हा राखी म्हणते- तू काय वेडा झालाय का? एका ताटात एका इडलीसाठी आणि एका वड्यासाठी हा ६०० रुपये मागत आहे. तो मला मूर्ख बनवत आहे.

मात्र, या वेळी दुकानदार सांगतो की, फक्त इडली - वडा नाही तर तुम्ही या दुकानातून जी काही खरेदी केलंय त्याचं एकत्रित बिल केलंय. पण राखीला खात्री असते कि दुकानदार तिला मूर्ख बनवतोय.

यानंतर राखी सावंत नाश्ता करते. पण त्याआधी ती मोबाईल काढून काहीतरी वाचायला जाते. ती म्हणते काही चुकलं तर मला माफ कर. पण तिथे उपस्थित दुकानदार तिला रमझान मधील प्रार्थना म्हणून दाखवतो.

राखी दुकानदार सांगतो त्याप्रमाणे प्रार्थना म्हणायला लागते. त्यानंतर ती खायला लागते. यानंतर चाहत्यांनी तिचे कौतुक केले कारण राखीला येत नसूनही हे सर्व शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT