Rakhi Sawant Sakal
मनोरंजन

Rakhi Sawant Arrested : राखी सावंतला पोलिसांकडून अटक

मॉडेलचा फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आंबोळी पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. मॉडेलचा फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आंबोळी पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की राखी सावंत आज दुपारी 3 वाजता तिचा पती आदिलसोबत तिची डान्स अ‍ॅकॅडमी सुरू करणार होती, त्यापूर्वीच पोलिसांनी तिला अटक केली आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. शर्लिन चोप्राने ट्विटरवर लिहिले, “ब्रेकिंग न्यूज !!! आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.

शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तिने पत्रकार परिषदेदरम्यान चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

गेल्या वर्षी राखीने पोलिसांना सांगितले की, शर्लिन चोप्राने 6 नोव्हेंबर 2022 रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तिने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि असभ्य भाषा वापरली होती.

राखीने नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'माझ्याबद्दलच्या कमेंटमुळे माझे आयुष्य अशांत झाले आहे हे सांगताना मला खूप वाईट वाटते. यामुळे, माझ्या प्रियकराने मला विचारले आहे की शर्लिन जे बोलत आहे त्यात काही तथ्य आहे का? तुला खरोखर 10 बॉयफ्रेंड आहेत का? तिने फक्त येऊन मीडियात जे काही बोलायचे ते सांगितले आणि आता मला त्याची किंमत मोजावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT