rakhi sawant kidding like ghost to vikas sawant bigg boss marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: घाबरलं बेनं! राखीने मस्करी मस्करीत विकासची ठासली..

एका आठवड्यातच राखीने बिग बॉसचं घर दणाणून सोडलंय..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहे. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती... काय करेल याचा नेम नाही. तिच्या वागण्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. काल तर रायखीने विकासची भलतीच मस्करी केली. यावेळी विकासची चांगलीच घाबरगुंडी उडलेली दिसली. राखीने अंगात भूत संचारल्या सारखीच घरात फिरत होती.

(rakhi sawant kidding like ghost to vikas sawant bigg boss marathi 4)

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या रोज नवीन राडा सुरू आहे. अक्षय - प्रसाद मध्ये झाला जोरदार राडा असो किंवा अपूर्वा आणि विकासचं कडक्याचं भांडण.. ही सगळे सदस्य एकमेकांशी भांडत असले तरी राखी मात्र रासिकांचं फुल्ल टू मनोरंजन करत आहे. राखीने आपल्या मिश्किल स्वभावाने राखी मनोरंजनाचा बार उडवत आहे. असाच एक बार तिने काल विकासवर सोडला..

कालपासून राखीने घरात धुडगूस घातला आहे. राखीच्या वागण्यामुळे विकासची घाबरगुंडी उडाली आहे... तिने सध्या अंगात भूत संचारल्यासारखे वागायचे ठरवले आहे, त्यामुळे ती कुणाला काहीही बोलत आहे. त्यामुळे सदस्यांचे कालपासून जगणे मुश्किल केले आहे.. विकासला तर तिने वेड लावलं आहे. तू माझा नवरा आहे.. असं ती विकासला म्हणाली..

राखी विकासला म्हणाली, याचं नावं राजू आहे, हा माझा नवरा आहे... राखीच्या वागणुकीला बघून किरण माने विकासला म्हणाले, तिच्या अंगात काहीतरी आलंय... राखीने विकासला विचारले, तुला माझं भयानक रूप बघायचे आहे का ? मी तुला सोडणार नाही... राखीच्या या अवताराने प्रेक्षक आणि घरातले सदस्य वेडे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT