Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: आदिल मी तुला सोडणार नाय! राखीनं भरला नवऱ्याला दम...

सकाळ डिजिटल टीम

सध्या राखी सावंत तिच्या लग्नामुळं चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच तिच्या आईचं निधन झालं आणि आता तिचं लग्न पुन्हा चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आणि आदिलचं लग्नाच प्रकरण फार गाजलं. आता पुन्हा राखीनं आदीलवर आरोप केले आणि त्याला सहजासहजी सोडणार नसल्याची धमकीच दिली.

गेल्या काही दिवसापुर्वी राखीनं प्रियकर आदिलसोबतच्या लग्नाचा खुलासा केला. व्हिडीओ आणि फोटो शेअर करून राखीने आदिलसोबत लग्न केल्याचा पुरावाही सादर केला. मात्र आदिलने याबद्दल बोलणं टाळलं. त्यामुळे तो या लग्नापासून खुश नसल्याचं बोललं जात होतं. त्यातच आदिलने शेवटी मौन सोडलं आणि सोशल मीडियावर पोस्ट करून राखी सोबत झालेल्या लग्नाचा स्वीकार केला

मात्र आता पुन्हा राखीचं लग्न धोक्यात आल्याचं तिचं म्हणनं आहे. काल ती पापाराझींपुढे रडली आणि 'माझे लग्न धोक्यात आले आहे. मला माझे लग्न वाचवायचं आहे.' असं म्हणाली. आता पुन्हा तिने पापाराझींसमोर येत आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.

'आदिला इंडस्ट्रीत येवून स्टार बनायचं होतं त्यामुळे त्याने माझा वापर केला. त्याला केवळ स्टार बनायचं होतं. तो खुप खोटं बालतो. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. त्याने त्या मुलीला ब्लॉक केलं नाही आणि आता ती मुलगी त्याला बॅल्कमेल करत आहेत. मी त्याला सोडणार नाही. मला तलाकची धमकी देवू नकोय', त्याचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचेही आरोप तिने केला.

आता राखीनं उल्लेख केलेली ती मुलगी कोण याबद्दल राखीनं काही स्पष्ट केलेलं नाही. आदिलही मिडियासमोर येण टाळतं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काय सुरु आहे. असा प्रश्न तर तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्याबरोबर राखी पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

SCROLL FOR NEXT