rakhi sawant mira jagannath vishal nikam aroh velankar are boss in Bigg Boss Marathi 4 new task sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: वाट लागली! बिग बॉस गेले सुट्टीवर.. राखीच्या हातात घरचा कारभार..

बिग बॉस मराठीच्या घरात होतोय नवीन राडा, राखीने केलंय सळो की पळो..

नीलेश अडसूळ

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ आता मोठ्या रंजक वळणावर आलं आहे. घरात आता चार वााइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. बिग बॉसच्या खेळाचा कडक अनुभव असलेले सगळे मातब्बर आहेत हे चौघे. त्यातील एक राखी सावंत जिला हिंदी बिग बॉसचा दोन वेळा अनुभव आहे, दुसरा विशाल निकम जो बिग बॉस ३ चा विजेता आहे तर आरोह आणि मीरा हे बिग बॉस ३ मधले चांगले तगडे स्पर्धक होते. त्यामुळे असे दमदार स्पर्धक आल्याने बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा हंगामा पाहायला मिळत आहे.

(rakhi sawant mira jagannath vishal nikam aroh velankar are boss in Bigg Boss Marathi 4 new task)

जेव्हापासून या चार वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या आहेत तेव्हापासून त्यांनी घरातील इतर सदस्यांना सळो की पळो करून सोडले आहे. आता तर बिग बॉसने स्वतः सुट्टीवर जाऊन राखी, मीरा, आरोह आणि विशाल यांनी बिग बॉसच्या घराचे बॉस केले आहे. त्यातही राखी या सर्व घराची राणी झाली आहे. त्यामुळे घरात नुसता राडा सुरू आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात या चार बॉस चा नुसता जयजयकार सुरू आहे. विकास मीराचे कौतुक करत म्हणतो, “मीरा राणी तू खूप छान आहे. एवढी CUTE दिसते ना तू कि मी सगळ्यात जास्त कावरा बावरा होतो तुला बघून” त्यावर राखी म्हणाली, 'नुसते डायलॉग नको लोटांगण घाल.' तर दुसरीकडे अपूर्वा आरोहला मनवताना दिसणार आहे. तर प्रसादने देखील “मीरा माता कि जय, मी तुझ्या चरणाशी पडत आहे” असे म्हणत शिड्यांवरून लोटांगण घातले.

तर स्नेहलताकडून चुकून गळ्यात माइक घालायचे राहून जाते. याची आठवण बिग बॉस तीला करून देतात. पण राखी मात्रा हा मुद्दा चांगलाच ताणते. जर चूक झालीय तर शिक्षा ही व्हायला हवी असं म्हणत राखी स्नेहलताला चार वेळा स्विमिंग पूल मध्ये उडी मारायला सांगते. स्नेहलता आणि राखी मध्ये त्यावर वाद ही होतो. पण शेवटी स्नेहलताला राखीचे ऐकावेच लागले. आल्यापासून राखीने नुसती एकेकाची वाट लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT