rakhi sawant on chandrayaan 3 and request pm narendra modi took care of mumbai potholes SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant to Modi: आतातरी मुंबईतले खड्डे... चांद्रयान 3 नंतर राखी सावंतची नरेंद्र मोदींना विनंती

राखी सावंतने चांद्रयान 3 चा उल्लेख करतानाच नरेंद्र मोदींना एक वेगळीच विनंती केलीय

Devendra Jadhav

Rakhi Sawant to Modi on Chandrayan 3 News: काल चांद्रयान 3 मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. नरेंद्र मोदींनी चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं.

अशातच राखी सावंतने चांद्रयान 3 चा उल्लेख करतानाच नरेंद्र मोदींना एक वेगळीच विनंती केलीय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली राखी पाहूया..

(rakhi sawant on chandrayaan 3 and request pm narendra modi took care of mumbai potholes)

राखी सावंत नेहमीच तिच्या फ्लर्टीश स्टाईल आणि मस्तीमुळे चर्चेत असते. राखी जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडत असते.

14 जुलै रोजी देशात 'चांद्रयान 3' लाँच करण्यात आले आणि संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला. राखी सावंतनेही याबाबत आपले मत व्यक्त केले .

लोकांशी संवाद साधताना राखी सावंतने 'चांद्रयान 3' बद्दल सांगितले. वादग्रस्त राखीने 'चांद्रयान 3' वर आपला आनंद व्यक्त केला.

याशिवाय काल चांद्रयान 3 जसं लॉंच झालं तसं स्वतःलाही लॉंच करण्याचा विचार राखी करतेय. राखी म्हणाली, 'हा एक मोठा दिवस आहे,आज पांढरे कपडे घालायचे आहेत कारण चांद्रयान 3 चंद्रावर गेले आहे.'

राखी पुढे म्हणाली, 'आज माझ्या साडीत चांदणेआहे, आज मी चांद्रयानसह स्वतःला कसे लॉन्च केले ते पहा. आज मला या महान यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करायचे आहे. मी पण एक वैज्ञानिक आहे. मी स्वतःला कसे लाँच केले ते तुम्ही पाहिले का?'

मोदीजी पॅरिसमध्ये आहेत हे जाणून राखीला आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली, 'काय, ते पॅरिसमध्ये आहेत? मग ते रॉकेट कसे पाहणार?

पॅरिसमधून चांद्रयान 3 पाहण्यासाठी त्यांच्याकडे दुर्बीण आहे का? मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की मुंबईतील रस्ते दुरुस्त केले तर बरे होईल. चंद्राप्रमाणेच इथे अनेक खड्डेही आहेत.

राखी शेवटी लिहीते.. माझा मूड खराब आहे, मोदीजींनी मला चांद्रयान 3 सारखं लाँच का केले नाही? मी रॉकेटसारखी लॉंच होईल आणि माझ्या चंद्राला भेटेल. मला सरळ जायचे आहे.'

चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण पाहून राखीला खूप आनंद झाला आहे आणि राष्ट्रीय अभिमानाच्या या क्षणाबद्दल तिच्याकडे बरंच काही बोलली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT