Rakhi sawant, bigg boss marathi, bigg boss SAKAL
मनोरंजन

Rakhi Sawant: अटक होण्यापुर्वी राखीने केला मोठा ड्रामा, बुरखा घालून..

राखीने प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबतच्या तिच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Devendra Jadhav

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चेत आहे. राखीने प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबतच्या तिच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर तिने सांगितले होते की, लग्नानंतर तिनेही इस्लामचा स्वीकार केला आणि आता ती फातिमा झाली आहे.

दुसरीकडे आदिलने आधी त्याच्या लग्नाला नकार दिला होता, त्यामुळे राखी दुःखी झाली होती. आदिलचा नकार आणि आईच्या प्रकृतीबाबत ती मीडियासमोर रडताना दिसली. पुढे मग राखी सावंतसोबतचे लग्न आदिलने मान्य केले. दरम्यान, ती आता मुंबईत पती आदिल खान दुर्रानीसोबत बुरखा परिधान करताना दिसली.

ड्रामा क्वीन राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांचे लग्न झाले. आदिलने नुकतेच राखी सावंतसोबतचे लग्न स्वीकारले आहे. त्याच वेळी, अभिनेत्रीने खुलासा केला होता की आदिलला तिला बुरखा घातलेला पाहणे आवडते.

यानंतर राखी पहिल्यांदा बुरखा घालून दिसली. बुरखा घालून राखी सावंत पती आदिलसोबत तिच्या आजारी आईला रुग्णालयात भेटायला गेली होती. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. राखीच्या लूकचे चाहते कौतुक करत असतानाच अनेक जण तिला ड्रामेबाज देखील म्हणत आहेत.

या व्हिडिओमध्ये राखी सावंत काळ्या आणि तपकिरी रंगाच्या बुरख्यात दिसत आहे. पती आदिलही तिच्यासोबत आहे. राखी तिच्या आईला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता हे पाहून सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT