Rakhi Sawant  Sakal
मनोरंजन

Rakhi Sawant: पती आदिलसोबत वाद सुरु असताना राखी सावंतचं मोठं पाऊल, दुबईत उघडली अ‍ॅक्टिंग अकादमी

राखीने आत्तापर्यंत तिच्या पतीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यासोबतच ती अनेकवेळा ढसाढसा रडतानाही दिसली.

सकाळ डिजिटल टीम

पती आदिल खान दुर्राणीच्या विश्वासघातामुळे अभिनेत्री राखी सावंत सध्या खूप दुःखी आहे. राखीने आत्तापर्यंत तिच्या पतीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यासोबतच ती अनेकवेळा ढसाढसा रडतानाही दिसली.

मात्र, आता तिच्या वेदनांमधून सावरत राखी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि नवीन मार्ग निवडत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिची नवीन अकादमीही सुरू केली आहे.

होय, राखी सावंत दुबईत तिची अभिनय अकादमी सुरू करणार आहे. या अकादमीच्या माध्यमातून लोकांना केवळ प्रशिक्षणच मिळणार नाही, तर बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याची संधीही मिळणार आहे. एका रिपोर्टनुसार, राखी म्हणाली, "मी एक अकादमी सुरू केली आहे जिथे आखाती आणि इतर देशांतील इच्छुक कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल."

राखी सावंतचा नवा म्युझिक व्हिडिओही लवकरच येणार आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली राखी मागील काळात तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करताना दिसली होती. या संगीतासाठी ती नवरी बनली आहे.

यासोबतच तिचे अनेक ग्लॅमरस लूकही पाहायला मिळाले. राखीला दुःख बाजूला ठेवून पुन्हा असे काम करताना पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

राखी सावंत 2022 मध्ये आदिल खानच्या प्रेमात पडली होती. आदिलची जगाशी ओळख करून देताना अभिनेत्रीने सांगितले की, तो कर्नाटकातील एका कार शोरूमचा मालक आहे. त्यानंतर मे 2022 मध्ये राखीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर फातिमा बनून आदिलशी गुपचूप लग्न केले होते, ज्याची माहिती तिने जानेवारी 2023 मध्ये दिली होती.

निकाहची बातमी शेअर केल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर राखीने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला, आधी तिच्यावर अत्याचार, नंतर त्याचे पहिले लग्न लपवणे, विवाहबाह्य संबंध, फसवणूक आणि माहित नाही आणखी किती आरोप आहेत. त्याच्यावर म्हैसूरमध्येही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT