rakhi 
मनोरंजन

राखी सावंतचा दावा, म्हणे सुशांत माझ्या स्वप्नात येऊन म्हणाला, 'मी तुझ्या पोटी पुर्नजन्म घेईन'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्या चाहत्यांमध्येही तणावाचं वातावरण आहे. सगळ्यांनाच त्याच्या आत्महत्येचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागलीये.त्याने हे एवढं मोठं पाऊल का उचललं असावं हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. याचदरम्यान बॉलीवूडची आयटम गर्ल राखी सावंतने असा दावा केला आहे की सुशांत सिंह राजपूतने आत्महत्येनंतर तिच्या स्वप्नात येऊन संभाषण केलं आहे.  

नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे आणि व्हिडिओमुळे चर्चेत असलेली राखी सावंत कधी काय करेल आणि काय बोलेल हे सांगता येत नाही. कित्येक दिवस राखी चर्चांपासून दूर होती. मात्र जास्त दिवस ती सोशल मिडिया आणि चर्चा यांपासून दूर राहू शकत नाही. यावेळी तर राखी सावंतने असा दावा केला आहे की ज्यामुळे सुशांतच्या कुटुंबियांची आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या पायाखालची जमीन सरकेल.

राखीने असा दावा केला आहे की सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर तिच्या स्वप्नात आला होता. राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत असा दावा केला आहे की ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. राखी या व्हिडिओमध्ये असं सांगतेय की, 'रात्री मी झोपत होते तेव्हा मला अचानक जोरात झटका लागला. मी विचारलं कोण आहे? तेव्हा समोरुन आवाजा आला की मी सुशांत. तुम्हाला विश्वास बसेल का की सुशांत माझ्या स्वप्नात आला होता आणि म्हणाला की मी पुन्हा जन्म घेणार आहे. माझ्या चाहत्यांना सांग की मी पुन्हा जन्म घेणार आहे.'

ती पुढे सांगते की, 'मी त्याला विचारलं कसा काय? तेव्हा तो म्हणाला मी लवकरंच सांगेन तुला यावर राखीने त्याला आत्ताच सांग असं म्हटल्यावर सुशांत म्हणाला, राखी तु जेव्हा लग्न करशील तेव्हा मी तुझ्या पोटी जन्म घेईन.'

राखीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना त्यांचा राग अनावर होत आहे. लोकांचं म्हणणं आहे की कोणाचा तरी मृत्यु झाला आहे यावर त्याची मस्करी करणं योग्य नाही.    

rakhi sawant share video says sushant came to my dream and said i will reincarnate through your womb  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजी महाविकास आघाडीत भूकंप! आमदार राहुल आवाडेंनी सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याला लावलं गळाला

Chinese GPS Tracker : कदंबा नौदल तळाजवळ आढळला चिनी GPS लावलेला समुद्री पक्षी; संशोधन की गुप्तहेरगिरी? संशय बळावला

Ind VS Sa 5th t20: विजयी शिक्क्यासाठी आजची लढत; आफ्रिकेविरुद्ध मालिका खिशात टाकण्याची भारताची संधी

SCROLL FOR NEXT