Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: असा कसा रे तु आदिल! रडून रडून राखीची अवस्था वाईट

Vaishali Patil

ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या आठवड्याच्या सुरुवातीला आदिल खानसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. राखीने सांगितले की, तीन महिने डेट केल्यानंतर तिने मागच्या वर्षी आदिलशी लग्न केले. मात्र आदिलने याला नकार देत आपले लग्न खोटे असल्याचे सांगितले.

आदिलने आपले लग्न झाल्याचे स्पष्ट केले असले तरी त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप तिला पत्नी म्हणून स्वीकारलेले नाही. दुसरीकडे, रडत रडत राखीची वाईट अवस्था झाली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी सावंतही रडताना दिसत आहे. राखीने रडत रडत सांगितले की, तिच्या आईला अजूनही याबाबत माहिती नाही. त्यांना कळले तर काय होईल. त्याचवेळी अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या नशिबात एवढं दुःख का आहे? ना मला जेवता येत आहे, ना मला झोप येत आहे.

जेव्हा पापाराझींनी राखीला आदिलच्या कुटुंबियांबद्दल विचारले तेव्हा राखी म्हणाली, 'आदिलच्या कुटुंबातील सदस्य खूप चांगले आहेत. त्यानी आदिलला समजावल आहे. लग्न झाले असेल तर ते स्वीकारायला  काय हरकत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांना माझा स्वीकार करायला वेळ लागेल, पण आदिलने माझ्यासोबत राहण्याची शपथ घेतली आहे.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांनी इस्लामिक रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. त्याच्या 'निकाह नामा' (विवाह प्रमाणपत्र)चा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रमाणपत्रानुसार राखी आणि आदिलचे लग्न २९ मे २०२२ रोजी झाले होते. त्यानंतर आता तिने नाव बदलून 'राखी सावंत फातिमा' केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT