Rakhi Sawant Instagram
मनोरंजन

राखी सावंतला सोशल मीडियावर मिळाली धमकी;'डोळ्यासमोर येऊ नकोस नाहीतर...'

ड्रामाक्वीन राखी सावंतसोबतच्या या नवीन 'ड्रामाची' चर्चा चांगलीच रंगलीय.

प्रणाली मोरे

ड्रामाक्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. आता तर सोशल मीडियावर तिला कुणीतरी खुलं आव्हान देत धमकी दिलीय. ते सुद्धा चक्क पोस्टच्या माध्यमातून. कोण आहे ती व्यक्ती?...तर राखी सावंतचा(Rakhi Sawant) एक्स पती रितेश सिंगने(Ritesh Singh) सोशल मीडियावर धमकी देणारी पोस्ट केल्यानं चांगलीच चर्चा रंगलीय. राखी सावंत आणि रितेश सिंग आता एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. राखीने काही दिवस आधी यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली होती. खरंतर,विभक्त झाल्यानंतरही रितेश सोशल मीडियावर राखीसोबतचे फोटो शेअर करताना दिसला होता. पण यावेळी रितेशने राखी संदर्भातल्या केलेल्या त्या पोस्टमुळे सोशल मीडियावर मात्र गोंधळ माजला आहे.

Rakhi Sawant with Ex.husband Ritesh SIngh

रितेशने इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखी सावंतसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,''राखी तुला एका सिंपल सजेशन आहे. तु प्रार्थना कर की कुठल्या गेम शो मध्ये तु माझ्या समोर येऊ नये याची. अन्यथा तुझी अशी वाट लावेन मी की तू पुन्हा कुठल्या शो मध्ये भाग घेण्याची हिम्मत करणार नाहीस. 'बिग बॉस १५' मधील एका वाइल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धकाचे मी काय हाल केले होते लक्षात असेल तुझ्या. तेव्हा चिल कर''.

Rakhi Sawant Post Image

आता रितेशच्या या पोस्टवर गप्प राहिल ती राखी कुठली. राखीनंही त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याची चांगलीच खडरपट्टी काढली. ती म्हणाली,''तुझा ड्रामा बंद कर''. यावर रितेशने उत्तर दिलंय की,''ड्रामा क्वीन तर तू आहेस''. त्यावर राखी त्याला म्हणाली,''यापुढे माझे फोटो तुझ्या पोस्टमध्ये वापरलेस तर खबरदार''. तेव्हा रितेश म्हणाला,''तु देखील माझं नाव वापरणं बंद करा. तेव्हा मी देखील तुझे फोटो वापरणं बंद करेन. तु परत भेट मला एखाद्या गेम शो मध्ये,मग पाहतो मी तुला''. राखी सावंत ने नुकतेच एका मुलाखतीत रितेशपासून वेगळं होण्याबाबत खुलासा केला होता.

ती म्हणाली होती,''आमच्यातील नातं संपवण्याचा निर्णय रितेशचा होता. त्यादिवशी सकाळी तो उठला आणि आपली बॅग भरू लागला आणि म्हणाला,मला तुझ्यासोबत राहायचं नाही. कारण तेव्हा त्याची पहिली पत्नी स्निग्धासोबत केस सुरू होती''. राखीनं त्यावेळी हे देखील सांगितलं होतं की, रितेशच्या मुलाला जन्म देण्यासाठी ती उत्सुक आहे. असो, या रितेश-राखीतील नव्या ड्रामानं नेचटकऱ्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT