Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: राखीला पाहिजे Z प्लस सुरक्षा.. लवकरच मोदींना भेटणार म्हणली, 'कंगणाला तर..'

Vaishali Patil

राखी सांवत हे बॉलिवूड मधलं असं नाव आहे जे नेहमी चर्चेत राहण्यासाठी काहीही करते. तिचे व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपुर्वी ती तिचा पती आदिलमुळे चर्चेत होती आता ती सलमान खानमुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी राखी सावंतने दोन ईमेल शेअर केले होते. ज्यामध्ये तिने मीडियाला सांगितले होते की, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्रिन्स नावाच्या व्यक्तीने तिला धमकी दिली आहे. तिने सलमान खान आणि त्याच्यात सुरु असलेल्या वादात बोलण्यास तिला मनाई केली होती. त्यांनी राखीला लॉरेंस बिष्णोई गॅंगकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली होती.

राखीनं यासंबंधी राखीशी मीडियाला सांगितलं होत की सलमान खानच्या प्रकरणात ती जर बोलली तर आम्ही तुला मारुन टाकू. कारण काही दिवसांपुर्वी राखीने लॉरेंस बिष्णोई गँगला सलमानला माफ करा असं सांगितलं होत.

आता त्यानंतर पुन्हा तिने मिडियाला सांगितले होते की माझा जीव घ्या पण माझा भाऊ सलमान खानला काहीही करु नका. त्याला सोडून द्या.

मात्र आता ती काहीतरी वेगळीच मागणी करतांना दियतेय. तिने आता या प्रकरणी सुरक्षेची गरज असल्याचं सांगतिलं आहे.

आता पुन्हा राखीने या संबधित मिडियाशी बोलतांना दिसली. एंटरटेनमेंट पोर्टल 'इन्स्टंट बॉलीवूड'शी खास बातचीत करताना राखी सावंत म्हणाली, 'मी मोदीजींना भेटते आहे. मला आता हे तुम्हाला सांगायचं नव्हतं. झेड सुरक्षेसाठी मी मोदीजींना भेटत आहे. मी राजनाथजी आणि मोदीजींना झेड सुरक्षिततेसाठी भेटणार आहे.'

'जेव्हा ते कंगना राणौतला झेड सुरक्षा देऊ शकतात, तर ते मला का देऊ शकत नाहीत. तिला कोणतीही धमकी मिळाली नाही तरीही तिला ही सुरक्षा पुरवण्यात आली होती. मला तर धमकी आली आहे. माझ्याकडे पूर्ण मेल आहे. माझ्याकडे सर्व काही आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT