Rakshabandhan 2022 esakal
मनोरंजन

Rakshabandhan 2022 : रस्त्यावर उतरुन अभिनेत्री अदाचं 'रक्षाबंधन'

बॉलीवूडमध्ये देखील रक्षाबंधन फेस्टिव्ह सुरु झाला आहे. यावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी रक्षाबंधनचे फोटो शेयर करण्यास सुरुवात केली आहे.

युगंधर ताजणे

Rakshabandhan 2022: बॉलीवूडमध्ये देखील रक्षाबंधन फेस्टिव्ह सुरु झाला आहे. यावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी रक्षाबंधनचे फोटो शेयर करण्यास सुरुवात केली आहे. यासगळ्यात अभिनेत्री अदा शर्माचं रक्षाबंधन मात्र चर्चेत आलं आहे. सोशल (Social Media viral news) मीडियावर तिनं काही फोटो शेयर केले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. तिच्या फोटोंवर त्यांनी (viral video) वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अदानं नेहमीप्रमाणे यावर्षी देखील रक्षाबंधनचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अदानं रक्षाबंधनचे निमित्त साधत रस्त्यावर उतरुन चाहत्यांना राखी बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या हटक्या स्टाईलनं अदानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वीच्या तिच्या फोटोंना आणि व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. अदाला कुणी भाऊ नाही म्हणून तिनं रस्त्यावरील लोकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला आहे. त्यावर चाहत्यांनी तिचं कौतूकही केलं आहे. इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये अदानं एका रिक्षाचालकाला राखी बांधली आहे. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, तुमच्यामुळे मुंबईतील मुली या सुरक्षित आहे. तुम्ही घेत असलेली काळजी आमच्यासाठी महत्वाची आहे.

रिक्षाचालकाला राखी बांधून तिनं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अदा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. एका युझर्सनं तिच्या त्या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, अदाची अदाच निराळी आहे. तिचं खूप कौतूक....तिनं दाखवलेल्या माणुसकीसाठी तिचे आभार. अदाच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. विक्रम भट्टच्या 1920 मध्ये तिनं भूमिका केली होती. तसेच कमांडो 2 आणि कमांडो 3 मध्येही तिनं काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT