Rakul Preet SIng New Tweet about her wedding with jackky Bhagnani Instagram
मनोरंजन

Rakul Preet: बॉलीवूडला पुन्हा नव्या नवरीची चाहूल; जॅकी भगनानी सोबतच्या लग्नाबाबत रकुलचं मोठं विधान

2023 मध्ये रकुल प्रीत आपला बॉयफ्रेंड आणि निर्माता जॅकी भगनानी सोबत लग्न करणार असल्याची बातमी सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Rakul Preet: बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे, विकी-कतरिना,आलिया-रणबीर आणि Richa-Ali नंतर आता बातमी कानावर पडतेय की रकुल प्रीत सिंग देखील आपला बॉयफ्रेंड आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीसोबत सात फेरे घेणार आहे. बोललं जात आहे की,दोघं २०२३ मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. पण या दरम्यान आता रकुल प्रीत सिंगचं एक ट्वीट जोरदार व्हायल झालंय ज्यातून मोठी अपडेट समोर आली आहे. काय म्हणाली रकुल प्रीत त्या ट्वीटमध्ये?

रकुलच्या एका जवळच्या सूत्रांकडून माहिती समोर आली आहे की,''रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी २०२३ मध्ये लग्न करणार आहेत हे पक्कं ठरलंय. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि दोघांचा लग्नावर देखील विश्वास आहे''.

पण यादरम्यानं रकुलनं जे ट्वीट केलंय त्यात मजेदार अंदाजात लिहिलं आहे की,''माझ्याच आयुष्याशी जोडल्या गेलेल्या या बातमी संदर्भात मलाच माहित नाही.

रकुल प्रीतनं आपला भाऊ अमनला टॅग करत लिहिलं होतं की,''अमन तु ठरवून टाकलंस आणि मला सांगितलं देखील नाहीस. हे किती हास्यास्पद आहे,मला माझ्याच आयुष्यात इतकी मोठं गोष्ट घडतेय ते माहीत नाही''.(Rakul Preet SIng New Tweet about her wedding with jackky Bhagnani)

काही मीडिया रिपोर्टनुसार बातमी समोर आली होती की,दोघांच्या कुटुंबियांकडूनही लग्नाच्या महिन्याविषयी किंवा तारखेविषयी काहीच पक्क सांगण्यात आलेले नाही. पण रकुल आणि जॅकीच्या कुटुंबियांनी लग्नाची तयारी मात्र सुरु केली आहे. जॅकी भगनानीचे वडील वासू भगनानी मोठे निर्माता आहेत,त्यामुळे हे लग्न दिमाखात पार पडावं म्हणून त्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.

Rakul Preet SIng New Tweet about her wedding with jackky Bhagnani

रकुल प्रीतचा भाऊ अमन देखील आपल्या बहिणीच्या लग्नाविषयी बोलताना म्हणाला,''रकुलने जॅकी भगनानीसोबत काही प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले आहे. लग्न तर दोघे करणारच आहेत. पण अद्याप ते लग्न कधी करणार यावर दोघांनी काही ठरवलेलं नाही. जेव्हा रकुल याचा निर्णय घेईल तेव्हा ती चाहत्यांना स्वतःहून याविषयी सांगेल. रकुल लग्नाचं महत्त्व जाणते. तर जॅकी भगनानी सिनेक्षेत्रातील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहे. आणि सध्या तो अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. रकुल आणि जॅकी दोघेही कामात व्यस्त आहेत. त्यांची काही ध्येय आहेत,त्यासाठी ते मेहनत घेतायत''.

महत्त्वाचं सांगायचं तर, ऑक्टोबर २०२१ मध्ये पहिल्यांदा रकुल प्रीत सिंगने इन्स्टाग्रामवर जॅकी वरील आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, आपल्या वाढदिवशी तिनं जॅकीवर हे प्रेम व्यक्त करत एक थॅंक्यू नोट आणि फोटो देखील पोस्ट केला होता.

नुकताच रकुलनं १० ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस जॅकीसोबतच साजरा केला. तिनं वाढदिवसाचे फोटो देखील शेअर केले होते. दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं आहे. आता चाहते आशा लावून बसलेयत की लवकरच रकुल आपल्या लग्नाची बातमी देखील शेअर करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT