Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding Venue  esakal
मनोरंजन

Rakul-Jackky Wedding : 'रकुल' अन् 'जॅकी'च्या लग्नाचं ठिकाण बदललं, मोदी ठरले कारण, नेमकं घडलं काय?

बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती.

युगंधर ताजणे

Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding Venue change : बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर त्यांचे लग्न करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या लग्नाचे ठिकाणही ठरले होते. मात्र या सगळ्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता त्यांनी त्यांचे लग्नाचे ठिकाण बदलले आहे.

फेब्रुवारीच्या २१ तारखेला जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत हे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ते गोव्यामध्ये निवडक पाहुणे मंडळी आणि मित्र परिवार यांच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच ऐनवेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाण बदलल्याचे सांगण्यात येत आहे. ते ठिकाण बदलण्यामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन असल्याचे बोलले जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रकुल आणि जॅकी हे विदेशातील जाऊन लग्न करणार होते. मात्र त्याचवेळी मोदी यांनी भारताबाहेर जाऊन लग्न करण्यापेक्षा भारतातच लग्न करुन देशातील पर्यटनाला चालना द्यावी असे आवाहन केले होते. त्याला आता या जोडप्यानं प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे. मिडल ईस्टमध्ये जाऊन लग्न करण्याचा प्लॅन रकुल आणि जॅकी यांनी केला होता. त्यानंतर आता सहा महिन्यांनी त्यांनी ते ठिकाण बदलल्याचे सांगण्यात येत आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये मोदींनी त्यांच्या एका कार्यक्रमातून देशातील श्रीमंत आणि सेलिब्रेटींनी बाहेरच्या देशात जाऊन लग्न करण्यापेक्षा भारतातच लग्न करावे असे आवाहन केले होते. यानंतर जॅकी आणि रकुलनं त्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे.

जॅकी आणि रकूलच्या लग्नाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी त्यांच्या लग्नासाठी मोठं प्लॅनिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. नो फोन पॉलिसी असे सांगण्यात आले असून केवळ निवडक मित्र आणि कुटूंबिय यांच्या उपस्थित तो लग्नसोहळा पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT