Niharika Konidela Divorce: Esakal
मनोरंजन

Niharika Konidela Divorce: लग्नाच्या दोन वर्षातच राम चरणच्या बहिणीचा होणार घटस्फोट!

Vaishali Patil

Niharika Konidela-Chaitanya Jonnalagadda Divorce: काही दिवसापुर्वीच राम चरणच्या घरी छोट्या परिचे आगमन झाले. राम चरण आणि उपासना यांना 20 जूनला मुलगी झाली. जिचे नाव त्यांनी नाव क्लिन कारा कोनिडि असं ठेवलं. सध्या त्याच्या खरचं वातावरण आनंदित असतांना आता राम चरणशी निगडित एक बातमी समोर आली आहे.

राम चरणच्या कुटुंबातुन याबाबत बातमी समोर आली . राम चरणची बहीण आणि तेलुगू चित्रपटांची अभिनेत्री निहारिका कोनिडेला ही तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे.

निहारिका आणि चैतन्य जोन्नालगड्डा हे आता एकमेंकापासून वेगळे होणार आहेत. त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज देखील केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद होत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ते वेगळे होणार अशा अफवाही पसरल्या मात्र आता या अफवांवर शिक्कामोर्तब झाला आहे.

निहारिकाने या वर्षी एप्रिलमध्ये चैतन्यसोबतच्या लग्नातील सर्व फोटो डिलीट त्याचबरोबर ती तिचा भाऊ वरुण तेजच्या लग्नातही एकटीच दिसली होती. तेव्हा ती तिच्या पतीपासून वेगळी होणार अशा बातम्या समोर आल्या होत्या.

निहारिका कोनिडेला हिने ऑगस्ट 2020 मध्ये चैतन्यसोबत लग्न केले. या लग्न सोहळ्यात केवळ त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनी भाग घेतला होता. यानंतर, त्याने उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले, ज्यामध्ये राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला यांच्यासह दक्षिण चित्रपटांचे सर्व मोठे स्टार आणि अल्लू अर्जुन, साई धरम तेज आणि श्रीजा कल्याणसह अनेक स्टार्स उपस्थित होते.

लग्नाच्या अडिच वर्षातच त्याच्या खटके उडू लागले आणि त्यानंतर हे दोघ वेगळे राहू लागले होते. निहारिकाने कुकटपल्ली न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. कागदपत्रांमध्ये तिने न्यायाधीशांकडे पती चैतन्य जोन्नालगड्डा याला घटस्फोट देण्याची मागणी केली. दोघेही परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याचे बोलले जात आहे.

निहारिका ही अभिनेता आणि निर्माता नागेंद्र बाबू यांची मुलगी आहे, जे चिरंजीवीचा भाऊ आहे. सुपरस्टार राम चरण आणि अल्लू अर्जुन हे निहारिकाचे चुलत भाऊ आहेत. तर चैतन्य जेव्ही जे. प्रभाकर राव यांचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT