Ram Gopal Varma Comment on Ranbir Kapoor esakal
मनोरंजन

Ram Gopal Varma : 'मला रणबीर कपूरचे बूट...' प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे धक्कादायक विधान

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा सध्या तुफान चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

Ram Gopal Varma Comment on Ranbir Kapoor : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा सध्या तुफान चर्चेत आहे.त्याचा अॅनिमल नावाचा चित्रपट प्रेक्षकांना भयंकर आवडताना दिसतो आहे. त्याचे कौतुक होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे.

अशातच आता प्रख्यात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्मा हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियेमुळे चर्चेचा विषय असतात. त्यांच्या तऱ्हेवाईकपणाचे व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाले होते. त्यात त्यांनी एका नवख्या अभिनेत्रीसोबत जे काही केले होते. त्यामुळे ते ट्रोल झाले होते.

राम गोपाल वर्मा यांनी जेव्हा अॅनिमलमध्ये रणबीर कपूरचा अभिनय पाहिला तेव्हा त्यांनी त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी भारद्वाज रंगन यांच्या ब्लॉगवर त्या चित्रपटाचा रिव्ह्यू केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, अॅनिमलचा प्रभाव ओसरेपर्यत रणबीरचे प्रचंड प्रमाणात कौतुक होत राहिल. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारचा परिणाम समाजावर करेल यात शंका नाही. वर्मा यांनी रणबीरच्या त्या प्री इंटरव्हलची तुलना मायकल जॅक्सनच्या बीट इट सोबत केली आहे.

चित्रपटातील त्या इंटिमेट सीनचही कौतुक वर्मा यांनी केलं आहे. विजय जेव्हा यशस्वी होतो आणि तो न्यूड होत चालतो त्याचा आनंद व्यक्त करतो त्या दृष्याचे वर्मा यांनी कौतुक केले आहे. वर्मा यांनी पुढे म्हटले आहे की, संदीप वांगाजी तुम्ही तुमच्या पायाचा एक फोटो मला पाठवून द्या.मला त्यांना हात लावायचा आहे आणि त्याचे चुंबन घ्यायचे आहे.

ट्रेलर पाहिल्यावर आपण जरा चिंतित होतो की रणबीर हा तेवढं यश संपादन करेल का, मात्र आता तो भन्नाटच दिसतो आहे. रणबीरचे ते काम पाहून मला त्याच्या पायाचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्याचे पाय चाटायचे आहे. अशा शब्दांत राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या त्या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या बाबत अधिक माहिती देणारे वृत्त जनसत्तानं दिलं आहे.

यापूर्वी देखील राम गोपाल वर्मा त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. त्यात त्यांनी एका अभिनेत्रीसोबत केलेले कृत्य सोशल मीडियावर वादाचा विषय ठरला होता.r

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT